पक्व फल लाडू💐

मृणाल चा मेसेज..
मँडम.. गुळ,खोबरे व फळ युक्त प्रसाद करणार आहे. छान पदार्थ शिकवा. पाक,बर्फी वगैरे किचकट नको.
अगदी सोपा पदार्थ द्यावा.

मी खालील प्रमाणे पदार्थ दिला..

~~पक्व फल लाडू ~

साहित्य---
2वाट्या कणीक, 1वाटी बेसन,अर्धी वाटी नाचणी पीठ, अर्धी वाटी शेवया चुरून, अर्धी वाटी नारळ चव,1वाटी गूळ चुरून,1वाटी फळांचा गर(केळी कुसकरून) पिठीसाखर, तूप.1चिमूटभर दालचिनीपूड,2चमचे खारीक पूड.

कृती~तुपावर कणिक, नाचणी पीठ, बेसन एकापाठोपाठ भाजून घ्यावे. शेवया मोडून भाजून घेणे.गरम कढईत नारळ चव,गूळ,फळांचा गर,घालून एक.. दोन चटके देणे.
खाली उतरवून खारीक पूड, सह सर्व घालून हलवणे.
कोमट झाल्यावर लागेल तसतसे पातळ तूप घालून बदाम कतरी,काजू,बेदाणा लावून लाडू वळणे.

सूचना.. पीठीसाखर लागेल तशी अगदी थोडीच घालणे.

लाडू..पेपरकप/द्रोण मधून द्यावेत.
उ।न्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme