मन..💐

♥मन..
मनाच्याही अंतरातवेगळं विश्व असतं।
स्पंदनांच्या निनादात रममाण असतं।।

परिव्राजक होऊन संवाद साधत भटकते।
पारिजातक बनून गंधाळत मौन साधते।

कातरवेळी बावरं मन यमन छेडते।
तर उष:काली पाखर मन भूप आळवते।।

लाटा बनून उसळते,गगना गवसणी घालते।
वाटा बनून, जगताला दीप दर्शवते।।

प्रमाधनांविना सुंदर, चिरतरुण भासते।
साधनांविना सहज पर्यटन करते।।

नाही लागत परवाना वा तिकीट..।
क्षणात जळी तर क्षणात अंतराळी उडते सुसाट।।

संस्कारांच्या धारेने फोफावते, अभेद्य वृक्ष बनते।
आरोपांच्या खीळ्यांने खिळखिळे होते, कोसळते।।

त्या अंतर्मनालाही जोखायचं असतं,जपायचंअसतं।
कुरवाळत, गोंजारत, सुदृढ बनवायचं असतं।।

विकारांच्या जाळ्यात अडकवायचं नसतं।
तर विवेकाच्या गोफात गुंफून उजळायचं असतं।।

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme