श्री राम नामोच्चार..💐

💥श्री राम..नामोच्चार...

1984..श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी .. बालचमुंसाठी एकांकिका लिहिली.. अन् दिग्दर्शनाचे गुंतागुंतीचे काम पण माझ्यच गळ्यात पडले.. आता न झिडकारता निभावायचे ठरवले..

मी त्या शाळेत नवीन होते. मुले अनोळखी होती.. पहिल्या वाचन फेरीत मुलांचे अशुद्ध उच्चार कानाला खटकले.एक मुलगा तर 10वर्षाचा असून *र* नीट म्हणू शकत नव्हता.. पण त्याला काढून टाकायचे नाही, हा आदेश..

खुप पेच निर्माण झाला..
मनात रामाचा धावा केला.
दोन रात्री बसून *उच्चार शास्त्र* विषयी ची 6पुस्तके वाचून काढली.टिपणे काढली...

काही मौखीक व्यायाम, श्वसन व्यायाम, पंचेंद्रियांच्या कसरती, आढळल्या.

एक सोपा उपाय..
सकाळी आरश्यासमोर उभे राहून.. प्रथम जीभ आत गोलाकार फिरवून.. जबडा उच्चारासाठी तयार करणे..
अन् मग.. *बाराखड्या* तालासुरात म्हणणे.. वगैरे.

लगेचच मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. तरीही एक मुलगा *र* नीट म्हणत नव्हता...
मी रामाला आळवले.. लक्षात आले.. र.. अनेक वेळा आहे.. रामनामात !!!

मग.. प्रत्येक मुलाकडून खालचा रामरक्षेतील श्लोक 15..20 वेळा.. म्हणवून घेतला.पालकांना बोलावून जोरात सांगितले... घरी निदान 25वेळा श्लोक.. तालासुरात.. पूर्ण तोंड उघडून म्हणवून घ्यावे, नाही तर मी दुसरी मुले घेईन...

*श्रीराम राम रघूनंदन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम। *  ( राम रक्षा)
मात्रा लागू पडली.. अथक परिश्रमाने त्या बोबड्या मुलाला पण *र* स्पष्ट येऊ लागला..

आठ दिवसांनी  भव्य स्टेजवर नाटक सादर केले.
बक्षीस पटकावले ..

सांगायचा हेतू हा.. की आपण सारे जण..कधी भाषण, कथा,काव्य, वाचन, आभार, इ. अनेक निमित्ताने मंचावर जातो..

पण.. उच्चार स्पष्ट व्हावे म्हणून पूर्वतयारी करतो का?

श्रीरामरक्षा न लाजता.. जोरात .. खड्या स्वरात म्हणणे .. हा एक सुसंवादाचा सुलभ रियाज.. मंत्र आहे.. हे लक्षात घेऊन.. श्री रामचरणी नतमस्तक होऊन , वाणी तेजस्वी करुया..
उन्नती गाडगीळ 🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme