इच्छा शक्ती...💐
⭐इच्छा शक्ती..
मंगल अव्याहत बडबडत होती..
"किती उशीरा उठले मी ! हल्ली हे असचं होत! नवऱ्याला डबाच नाही दिला.. काय .. हे..
पाणी भरायचे राहीले.. नळ गेला.. आता बट्ट्याबोळ!
सतत.. मनाच्या सहाणेवर ..नकारात्मक विचार कोळसा उगाळत राहीला..
त्यामुळे.. चूका वाढतच गेल्या...
आमटीत मीठ विसरले. इडली चे वाटण करणे राहीले.महत्त्वाचा e mail करणे ,बँकेत चेक भरणे ,सासुबाईना वेळेवर औषध देणे .. सर्वच कामांची घडी विस्कटली..
कारण.. नवऱ्याला डबा दिला नाही.. हेच मनाच्या डोहात डाचत राहिले.
एखादे शल्य.. चूक.. झाली.. तर मनाला जोरदार ठणकावून सांगा..
" हो.. झाली खरं चूक ! जाऊदे.. आता संध्याकाळी मी त्यांच्या आवडीचे दोन पदार्थ जास्त करेन. पतीच्या आवडती सजावट करेन.. मी सुद्धा जास्त टवटवीत राहून त्याचे स्वागत करेन.."
असा सकारात्मक विचार मनात आणून मनाला कार्यात.. छंदात..गुंफून घेतले तर घर आनंदी होते.
सतत स्वत:ला दोष देणे, न्यूनगंडाने पछाडणे,यामुळे मन दुबळे होते. आत्मविश्वास कमी होतो.
अन् मग.. भवताल टपलेलचं आहे..
. टिमकी वाजवायला..
तरी.. या नववर्षा पासून .. मनाला कुरतडणे थांबवून..
आत्मविश्वास जागवुया..
हो.. अगदी Stephen Hawking सारखे...
त्यांच्या जबरदस्त इच्छा शक्ती ला मनोमन वंदन करून.. तश्शीच सकारात्मकता अंगीकारुया.. *मन समर्थ करुया* ..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment