अर्धवट..💐
🙎🏻अर्धवट..
विठाबाई(भाजीवाली) तणतणत होती..
" ताई, ही आमची चमी..
तिला डोके कमी ! दोन वेळा नापास झाली 10वीला.. नुसती सायकल फिरवते.. पोरांसंग हुंदडते.
तिला भाजी बी इकायची नाय! काय करावे समजत नाय!उफाड्याची पोर.. जीवाला घोर !""
मी म्हणले.. उद्या दुपारी दोन ला पाठवा. विचार करून सांगते..
चमेली आली.. उंच, टंच..आखीव.. रेखीव.. सारे भरभरून.. मग बुद्धी???
मी तिच्या हाती सुई धागा दिला.. क्षणार्धात ओवला.. म्हणजे नजर चांगली आहे!
कागदावर घड्या घालून कापायला दिले.. कात्री धरणे.. सरळ ,सुबक कापणे ही कलेत पण ती वाकबगार दिसली. मग मी तिला कापड चौकोनी कापायला सांगितले..
" माझी पाठ दुखते,जरा तू चालव ना मशीन '"
असे मी म्हणताच..
" मावशी, मला काही येत नाही. मी अर्धवट आहे.
*ए..चमी.. डोकं कमी*..
असे सारे चिडवतात.!
मी म्हणले.. " अग, साईकल ज्यांना येते त्यांना कोणतेही यंत्र चालवणे जमते"
खूप आनंदाने मशीन फिरवू लागली..
दोन.. तीन दिवसात मशीन वर हात सरसर फिरू लागले...
आनंदाने मन नाचू लागले.
मी तिला सांगितले..
शिवणकाम शिक.. प्रमाणपत्र हातात घेतल्या खेरीज कोणत्याही मुलांबरोबर फिरायचे नाही.
'" मावशी मला डोक कमी"
हेच डोक्यातून काढून टाक.
शिवण क्लासची फी भरणे.. विठाबाई ला शक्य नव्हते..
मग मी विचार केला..
मला माझ्या माधवी काकूने ... बाळाचे कपडे शिवायला शिकवले होते.
मी रोज तिला दुपारी झबली,टोपडी,लंगोट, बंडी,कुंची.. शिकवले..
तिचे सफाईदार शिवणकाम बघून.. तिने एका प्रसुती ग्रुहात .. बाळाचे कपडे द्यावे.. सुचवले.लेस ,झालर,कशीदा काम,
पँकींग करणे ती निगुतीने करू लागली..
छान.. खप होऊ लागला..
पैसे साठवु लागली...
मग.. फक्त.. ब्लाऊजेस,
फक्त.. पंजाबी ड्रेस शिकणे.. स्वतः च्या पैशातून.. हा तिला छंद लागला..
वाह्यात पणा.. उडाणटप्पुपणा बंद झाला.
मग मी तिला हळूच सांगितले..
12वी पास झालीस ना, तर जास्त चांगला नवरा मिळेल.. आत्ता ज्या पोरांबरोबर हुंदडतेस ना.. ती.. टपोरी पोरे.. मिळवती नाहीत.. आता तू छान कमावतेस.. हे छान शरीर उधळायचं नसत.. खूप शिकलेल्या, चांगले संस्कार असलेल्या एकाच व्यक्ती ला अर्पण करायचं असतं!
मी ऐकून आहे.. तू रोज नवीन पोरांबरोबर भटकतेस ते !
" मावशी, ती पोरं मला अर्धवट, धांदरट, म्हणत नाहीत. मला सुंदर म्हणतात , सगळी घरची ,माणसे मला अर्धवट म्हणतात...
अगदी खरं.. अनेक वेळा.. स्त्री.. स्त्री ला बावळट,वेडपट,ठरवते.. अगदी सुशिक्षित स्त्रिया.. द्वेष, मत्सर, हेवा, जळफळाट यातून.. सतत दुसऱ्या स्त्री ला बदनाम करतात. स्त्री ला दीन,लीन,हिन ,ठरवणे.... दुसऱ्या च्या घरात नाक खुपसणे.. चुगली करणे, वावड्या उठवणे.. कान भरणे.. विष पेरणे.. मने कलुषित करून.. एखादी ला जीवनातून उठवणे.. उद्ध्वस्त करणे हे काम स्त्रीया करतात.
या वर्षी.. महिला दिन निमित्ताने.. हे ठरवुया..
प्रत्येक व्यक्ती.. मग स्त्री वा पुरुष.. तिला क्षूद्र न ठरवता.. सहज जमले तर हळुवार फुंकर घालून तिला फुलवुया..
अन् मग.. हे *महिला दिन* साजरे करण्याची गरज पडणार नाही.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment