अनोखा उपक्रम...💐

🌱अनोखा उपक्रम..

नगर जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसलेले  *सावरगाव तळ* एक चिमुकले पण मोठा आदर्श निर्माण करणारे गाव!

तेथे.. गावात कुणाचेही निधन झाले तर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता..घरासमोरच खड्डा तयार करून, त्यात रक्षा व अस्थी विसर्जित करून त्यावर झाड लावतात. म्रुत व्यक्ती व्रुक्ष रुपात जिवंत स्मृती बनून सोबत राहते.

यासाठी गावकरी मोठ्या मनाने साथ देतात.

अस्थी विसर्जनामुळे नद्या प्रदूषण होत असे.. ते टळते!!!

आपली जिव्हाळ्याची व्यक्ती झाड बनून आपल्या सोबत आहे, या भावनेने झाडाची जास्त मायेने काळजी घेतली जाते..
व्रुक्ष संवर्धन होते..जल संवर्धन होते. फळफळावळ सम्रुद्ध होते.
मुख्य नवीन उपक्रमाला गावकऱ्यांची उत्स्फूर्त साथ मिळाली..

म्हणजेच जाणीवांची बाग फुलली!!!👏👏
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme