बाल गंधर्व रंग मंदिर..💐
♥बाल गंधर्व रंग मंदिर..
26 जून1968 या दिनी जंगली महाराज पथावर संभाजी बागेजवळ, झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या साक्षीने एका भव्य.. दिव्य वास्तुचे उदघाटन झाले.. अन्..ती वास्तु.. समस्त पुणेकरांच्या मर्मबंधातली ठेव ठरली!
वातानुकूलित नाट्यग्रुह!
साजिरा रंगमंच..
30'×44'×22' एवढा प्रशस्त!
आसन क्षमता..
तळमजल्यावर..669
सज्जात... 320
शिवाय एक विशाल कलादालन..प्रदर्शनांसाठी!
कलाकारांची कदर करणारी खास.. खास.. निवास व्यवस्था..
बालगंधर्व नावाला साजेसे .. वैभव!
प्रत्येक कला..एक उत्सव!
सतत चालतो तेथे *मराठी*
कलाकृती चा होतो गौरव!
ही वास्तू .. एक अनमोल ठेवा..
असे ठिकाण.. की ज्याचा कुणीही करावा.. हेवा!
प्रत्येक पुणेकरांना घालते गारुड..
असेच आहे त्या.. मंदिराचे रूपडं !
गंमत म्हणजे.. ही एकमेव अशी वास्तु आहे..
की तेथे घामट,कळकट ,अवतारात कुणी जात नाही..
प्रेक्षक.. म्हणून शिरताना..
आपसूकच रोजच्या पंजाबी ड्रेस, जीन्स.. शर्ट ला कोपऱ्यात टाकून..
मनापासून वाटते..
टोपपदरी साडी नेसावी..
सुबक तिपेडी वळावी..
टपोरी..हासरी.. मोगर माळ माळावी..
इवली नथनी उडवावी..
बांगड्यांची रंगसंगती साधावी..
अत्तर.. गुलाब शिंपण व्हावी..
या वास्तुला एक पेशवाई बाज आहे..
वैभवशाली नाट्य सागराची एक गाज आहे..
खास मराठी साजश्रुंगार करुन जायचं हा जणू, रितीरिवाज आहे!!!
अन्.. वास्तुच्या प्रत्येक कणाकणात *मी मराठी* चा आवाज आहे!!!
अन् हा आवाज.. सुवर्ण महोत्सवी वर्षातच ..
बंद होणार..
सांस्कृतिक वारसा..
कलेचा आरसा..
व्यक्तीमत्वाचा ठसा..
नष्ट होणार..(काही काळापुरता)
असेही असैल कदाचित..
पण आत्ता मात्र प्रत्येक रसिक मनात आहे फक्त ..
हळहळ!!!या दिव्य सांस्कृतिक व्रुक्षाची अखंड राहो.. सळसळ
हीच एकमेव प्रार्थना..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment