उठा..उठा..चिऊताई..💐

उठा ... उठा ... चिऊताई ...
अंगावर उन्हें आल्यावर आभा दचकून् उठली ! ९'३० ! बापरे ! अभय अजुनही सुस्त! काल रात्रि २ पर्यंत चालली पार्टी! त्याच्या खुणा ... अॅश ट्रे थोटकाने भरलेला ! रिकामे चषक ! रिकामा आइस बाँक्स ! चुरगळलेले पेपर !! आरशात याहिले , डोळे सुजलेले ! हळू हळू चंगळवादाच्या गर्तेत अडकतो आहोत! दुकान व
घर सासर्यांचे ! त्यावर नवरा फुशारक्या मारतो ! मी कुणाची नोकरी करत नाहीं! मला हे चालत नाहीं! आपलं बुवा असं ... नुसता खोटा डोलारा !
काल ताई म्हणाली " काय जरुरी अन्न मागवण्याची ?
४ तर जेवणारी ! आभा , जपून ग ! "खरय तिच ! अस उथळून कस चालेल ?  त्याच्या नादाने एक का होईना पेग घ्यायची सवय लागली आहे. रोज शाँपिंग ,पार्टी  , मस्ती ! असलेली नोकरी सुद्धा अभयने सोडायला लावली !दुकानाकडे तर तो बघतच नाहीं! नुसती गुर्मी ।
ताई सतत सांगते " आभा , कष्ट करा ! चैन कमी करा "
पण अभय तिला नावे ठेवतो !
उलट सुलट विचारांचा पिंगा मनात चालू,इतक्यात बाहेर बालगोपालांचा दंगा कानावर येतो ! ५ वर्षीय राधा नाचत गाते ...
" उठा ,उठा चिऊताई ।
झोपलेल्या अश्या तुम्ही,
आणायाचे मग कुणी?
बाळासाठी चारा पाणी?
चिमुकल्या ?
आभा पुटपुटते " खरच ! स्त्री सुस्त तर घर अस्ताव्यस्त !
स्त्री व्यस्त की घर मस्त ! पट्कन उठते , झरझर घर आवरते , अन् भरभर नोकरीसाठी बाहेर पडते , गुणगुणतघ ...
उठा , उठा ,चिऊताई ...
जाऊया नोकरीसाठी ..
होणा-या बाळासाठी ...
चिमुकल्या ...
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

  1. इथे सुद्धा चिमणा नशेत लोळतोच आहे,आणि चिमुकल्या बाळासाठी चारापाणीं आणायला चिऊताईच बाहेर पडते आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme