Good bye ... प्लास्टिक💐
👭Good bye...प्लास्टिक...
एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचवायचं,अन् कालांतराने पायदळी तुडवायचं .. मग व्यक्ती असो वा वस्तू..
प्लास्टिकला असचं डोक्यावर घेतले.. त्यावाचून जीवन अशक्य वाटू लागले.. अन् ज्या माणसाने त्याला निर्माण केले.. त्याच्या डोक्यावरच प्लास्टिक ने मिरे वाटले..गळे घोटले..गाईगुरांचे प्राण घेलले.. प्रदूषण, कचरा इ.ने नैसर्गिक हानी केली.. अकांड तांडव विकोपाला गेल्यावर.. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर..* प्लास्टिक बंद * आदेश मिळाला..
आता दूध, तेल,पाणी, वगैरे द्रव पदार्थ बहुतेक टेट्रा पँक मधून मिळतील.
म्हणजेच भरमसाठ कागद वापर होईल..
*कागद* तरी किती पुरणार? जंगल संपत्ती नष्ट होत आहे.. मग परत ..येरे माझ्या मागल्या.. काचेच्या पारदर्शक.. स्वच्छ बाटल्या येतील.. जुने ते सोने.. जाहिराती होतील...
परत..जपणूक.. सांडेल..फुटेल.. धाकधुक.!!!
चक्र चालत राहणार!!!
विचार पूर्वक नियोजन नाही.. कुटुंब नियोजन.. जलसंवर्धन.. वनसंवर्धन.. संस्कृती संवर्धन हे सारेच मानवी जीवन संपन्न होण्यासाठी जरुरी आहे..
पण.. विचार कोण करतयं?
लक्षात कोण घेतयं?
केवळ दुर्लक्ष, अविचार इ.मुळे प्लास्टिक ची झाली चांदी !
अन् आज..उशिरा का होईना विचार पूर्वक पाऊल उचलून प्लास्टिक वर घातली.. बंदी !!!
या बंदी चे आपण स्वागत करूया.. अन् सहकार्य करुया..
उन्नती गाडगीळ 🙏🌹

Comments
Post a Comment