छोटू.....

👨‍🌾 छोटू...
धरा स्वतः  अस्थिर असून तिच्या मुलांना स्थिर ठेवते.
तद्वत आमचा छोटू...
मीना सांगत होती...
"मी इ.9वीत व भाऊ.. छोटू.. 7 वीत.. अचानक पित्रु छत्र हारपले.. गाडे खिळखिळे झाले.. घराचा कणाच निखळला.. आईने हिकमतीने काम मिळवले..
8 दिवस आई कामाला जात होती..
एक दिवस छोटूने गाल फुगवत.. आईच्या कमरेला विळखा घालत.. विनवले..
,"आई. तुम्ही दोघींनी कामाला जायचे नाही.. मी उद्यापासून.. काम व शाळा दोन्ही करणार !!!
हट्ट च धरला.. बालमुखातून देवच बोलला.. अन् सुरु झाले जीवन चक्र !!!
रोज पहाटे चारचा गजर.. अपार अंधार.. मनी घोर निर्धार.. चहा.. चपातीचा आधार.. पायताण जीर्ण.. पण पावले दमदार.. रातकिडे गुणगुणत.. देतहोते.. धीर!काजवे चमचमत.. दाखवत मार्ग..
.. वर्तमानपत्रांचे वर्गीकरण करणे.. जुळवणे.. गठ्ठे बांंधणे.. सारे करून इवल्या कोवळ्या खांद्यावर.. वर्तमान भार घेऊन भविष्याची स्वप्ने  रंगवत होता..
हर फिक्रको धुएँमे उडाता.. चला.. गया ।
गाणे गुणगुणत.. शीळ घालत.. जुल्फे हालवत.. हासत.. खेळत.. अनंत पायऱ्या.. चढत उतरत.. घराघरात वर्तमानपत्र टाकत चालत ..  फुलपँट मथे आला.. अभ्यास पण चालू होता..
सहस्त्र रश्मी.. उधळून रोज उर्जा देत होती.. आई देवाला घालत होती साकडं.. मम बाळाचं काही करू नको वाकडं...
इतर पेपर टाकणारी मुले.. बीड्या ओढत.. तंबाखू चोळत.. जुगार खेळतं..
पण.. छोटूने त्यांची कामाची गती घेतली.. कुसंगती टाळली ! अभ्यामाची कास धरली..
मनमुराद बागडण्याच्या वयात पायात कष्टांचे बांधले पैंजण !पायाची झाली चाळणं!
आज..लखलखत्या दुनियेत त्याला उच्च स्थान.. मानपान.. सन्मान.. पण तो बाल वयात आमच्या मातेची पण माता बनला.. अपार धैर्याने.. तिला स्थैर्य दिले.. असा हा आमचा .. छोटू.. माता व पिता.. त्याला सौख्य .. शांती लाभो.. सर्वदा !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme