निर्धार ...

अनवधानाने अनवाणीच गच्चीत गेले ... कपडे आणायला ! अवघी दोन मिनटे ! पण तळपाय चांगलेच पोळले ! आंसू ओघळले ! अन् आठवल्या ... विमलताई !
त्यांच्या मुलाला बारावीला ८० % गुण मिळाले ! फक्त!
अपेक्षाभंग झालेल्या चोचीनी टोचून ,टोचून पाखरास विद्ध केले ! त्या इवल्या जीवाने घरात कोंडून घेऊन आत्महत्या केली !
अन् विमलताई तुटून गेल्या ! मुलगा आपल्यामुळे गेला , याने ती माऊली वेडी पिसी झाली! अन् जन्म भर चप्पल न वापरण्याची शिक्षा करुन घेतली ! भरदुपारी मुद्दाम त्या २ मैल लांब मंदिरात अनवाणी जात ! अगदी जन्मभर शिक्षा पाळली !
आपण शहाणे होऊया! नंतर शिक्षा न घेता , आजच मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहुया ! आधार देण्याचा निर्धार करुया !
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme