लोकमान्य दीप..

लोकमान्य दीप...🙏
जनमनातील अज्ञान रुपी तम सारून ज्ञान दीप उजळावा.. या ध्येयाने टिळक.. आगरकर दोन वातींची एक तेजोमय ज्योत बनली..
अन् शाळा.. उभारली..
पुणे.. अ. ब. चौकाजवळ फडणवीस वाडा निश्चित झाला..

वाडा.. विशाल.. पण.. पडझ़ड झालेला.. दोन रात्री खपून.. टिळक व नामजोशींनी.. वाडा झाडला.. उखडलेल्या भूमातेला पंचगव्य लिंपण केले.. कौले शाकारली..
कड्या.. कोयंड्यात वंगण घातले.
फळे लावले... तोरण बांधले.. दीप लावला.. शालामातेस साष्टांग दंडवत घालून.. देशातील सर्व मुलांना बुद्धी दे.. प्रार्थना केली.
शाळेच्या दारात.. टिळक स्वतः पगडी घालून उभे..
पालकांना वंदन करून.. मुलांना चंदन लावून स्वागत करायला..

गणित.. क्लिष्ट .. पण हासत.. खेळत.. शिकवत.
शाळेत.. अभ्यास.. व्यायाम.. खेळ.. संगीत.. चित्रकला अनिवार्य होते.

ब्रिटिश विरोधात.. जनमत तयार व्हावे.. या हेतूने ..व्रुत्तपत्र काढले.. नाव काय द्यावे.. विचार चालू होता..
मराठा, झुंझार.. नावे सुचवली गेली..

पण.. नावानेच.. सरकार चळचळा कापेल असे नाव.. केसरी.. ठरले..
केसरी.. कचेरीत.. स्वच्छता.. छापखान्यात खीळे जुळवणे ते लेखन..
सारे लीलया सांभाळले .

लेखणी.. कधी हातोडा.. छन्नी.. तळपती तलवार ..बनून सरकारला हादरून सोडत होती..

तर.. तीच लेखणी.. सहकारी .. गुरु.. रानडे.. आगरकर.. यांविषयी लिहीताना.. अश्रू.. फुले ढाळत होती.. हळवी होत होती..

कर्तव्य कठोर.. व्यक्तीमत्व.. स्वपुत्राला.. प्लेग झाला होता.. मुलगा तळमळत होता.. सारे घर.. सुन्न झाले होते.. उपचार हरले होते.

पण.. पत्नी वर.. विश्वासाने त्याला सोडून.. ते.. छापखान्यात गेले..
झणझणीत अग्रलेख.. लिहीला.. जनमानसात..
स्वातंत्र्य दीप प्रज्वलित केला..

किती लिहावे तितके कमीच..
अजोड देशप्रेम.. जाज्वल्य स्वाभिमान... भाषाप्रभू.. गणिती.. खगोल तज्ञ..
उत्तम शिक्षक.. लेखक.. संपादक.. वक्ते.... वज्रादपि कठोराणि..
म्रुदुनी कुसुमादपि।
अश्या अनंत वातींचा एक समर्थ.. चैतन्य दीप..
बाळ गंगाधर टिळक..
आज आपण पुजुया..
अन् त्यांची प्रत्येक वात (गुण)आपल्या अंतरात सामावून मनोदीप उजळुया..
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme