सळसळणाऱ्या.. पानात....

सळसळणा-या पानात ...वारा वाहे धुंद ग ...
झुळझुळणा-या पाण्यात, नाव चाले मंद ग ।
वळवळणा-या बाल्यात , तारुण्याची वीज ग ...
चळवळणा-या कृतीत ... क्रांति चे बीज ग ।
भळभळणा-या रक्तात , आंच ही तीव्र ग ...
हळहळणा-या मनात ... दु:खाची सल ग ।
जळफळणा-या ह्रदयात , आसूयेचा वास ग ...
कळवळणा-या प्रीतीत ... भावनेची ओल ग ।
गडगडणा-या मेघात , पावसाची नांदी ग ...
फडपडणा-या ध्वजात ... स्वातंत्र्याची फांदी ग ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme