हरिनामाचे टाळ....


हरिनामाचे टाळ धरून..
रुणझुणती धारा।
चिपळ्यांच्या तालातून..
मंद वाहे वारा।
भावभक्ती रसातून..
चंद्रभागा सुस्वरा।
विठ्ठल दर्शनातून..
आनंद चराचरा।

पंढरीची वारी ज्याची त्याची 

मंगल , " काकू, आज थोडेच काम करते अन् पळते "
मी नवलाने , " का ग , काय विशेष  ? "
मंगल भावूकतेने , " वारक-यांसाठी भाकरी कराया जायचय !"
मी कौतुकाने " वा ! किती करणार? "
मंगल सहजतेने " मी  १०० करते , पण ५० भाकरींचे पैसे घेत नाहीं , तेवढेच दान !" मी थक्क झाले.
तशीच माझी एक सखी ... सुबक शिवण काम करते . ती रोज २-३ पिशव्या शिवते , वारक-याना एक एक वाटते
या वर्षी १२०० पिशव्या तयार आहेत.
हे श्रमदान बघून माझे डोळे पाणावले ! त्यांची कर्म शक्ति व भक्ति ... दान करण्याची दानत यास शतश: प्रणाम!!!



पालखी.. प्रस्थान।

घन ओला.. सावळा..
पिंजला.. कापूस काळा ।
झंकारे.. टाळ.. म्रुदुंग..
हरि भजनात .. दंग ।
तुळस घेऊनीया डोई..
चालले.. पालखीचे भोई ।









   




पालखी माऊलींची 

🌹तनुच्या चुल्ह्यावर ..
तवा ठेवी पाठीचा ।
जाळं करी मनाचा..
ऐसा हा .. ज्ञाना..
ना कळे कुणा ।।

मूक.. मदमस्त रेडा..
त्याच्या मुखातुनी..
झरे.. अम्रुत वाणी ।
चमत्कार.. दावी जना..
ऐसा हा ज्ञाना ..
ना कळे कुणा ।।

त्याच ज्ञानरायाचा..
सोहळा.. पालखीचा।
बळं देई.. ज्ञानेश्वरी..
जयघोष.. ओठावरी..
धन्य.. धन्य.. पुण्यनगरी ।।
उन्नती गाडगीळ 🙏🌹



Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme