निसर्ग सखा...(पाऊस विभाग)

👫काल सकाळी.. हवेत घुसमट.. मळभ .. अन् घरातही.. त्या दोघांच्यात.. अबोला.. आदळ आपट.. चिडचिड.. तणतण.. फणफण..
आज.. त्याच्या टाय ची नाँट.. तिच्या करांविना बांधली गेली.. आज.. तिच्या कंगनाची.. किणकिण... त्याला किटकिट भासली..त्याने दिलेला गजरा.. तिने नाकारला..
A..B..C..D..E..G0.. म्हणायला दोघेही तयार नव्हते..
दोन दिशांना दोघे मुकाट गेले...
दुपारी.. त्याचा फोन तीने उचलला नाही..
तिचा.. msg.. त्याने reply..केला नाही..
संध्याकाळी.. ती घरी आली.. वीजेचा कडकडाट.. मेघांचा गडगडाट.. म्रुत्तिकेच्या धुंद गंथात.. धारा न्रुत्य.. झंकारले.. लाइट गेले..
ती.. काळजीने.. छत्री घेऊन गेटशी उभी।
तो. .  गाडीतून उतरला.. तिच्याकडे झेपावला.. एक छत्री मिटवत म्हणाला,
" एकाच छत्रात जायला.. एकच छत्री हवी.. हो ना?'
ती थरथरती वेल व्रुक्षास बिलगली..खिशातला गजरा.. तिच्या केसात सजला..
धुंद गंध.. चढती रात्र.. भारलेले गात्र.. लपलेला चंद्र.. सुखद गारवा.. मिलन गोडवा.. तनामनास त्रुप्ती देणारा असा हा .. वळीव..
उमेद देणारा.. उन्मेष वाढवणारा.. निसर्गसखा !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme