इवली कळी... अंगाई.. पिता म्हणतो...💐

( एक पुरुष .. कच-यातून उचलून एक बाळ दत्तक घेतो,
त्या बालिकेस ... अंगाई ...)
पवन छेडी सरगम .. मेघ गातो अंगाई ..
नीज .. बाळे नीज ..आता .. मीच तुझी आई  ।
.... इवली कळी .. कच-यातुनी ...
     अलगद् ... वेचली ।
 आद्य देवाच्या साक्षीनेी ...
काळजाची देठी केली ।। नीज बाळे .. नीज.......
श्वासा श्वासाचा  धागा बांधुनी  ...
विश्वासाचा ..  केला झुला ..
काळजाला .. नांगरुनी ...
जिव्हाळा  मी पेरला ।। नीज .. बाळे ...
अंधाराचा गाभा सोलुनी ...
आव्हाने मी पेलली  ।
वात्सल्याचे नाते जोडुनी ...
संरक्षक भिंत बांधली ।। नीज .. बाळे .. नीज ...
बाळे ... तुझे न् माझे नाते आहे  .. घट्ट .. घट्ट ...
चालताना ... जन  .. दावतील ... बोट ...
पण  , नात्याला .. साक्ष .. सूर्य .. चंद्राची ...
मग .. भिती कश्याला ग .. जन सागराची ?
नीज बाळे .. नीज आता ..मीच तुझी आई  !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme