द्रुष्टिकोन...

दृष्टिकोन ....
माझे बालपण ' वाडा ' संस्कृति त गेले . पावसाळ्यात घरातील भिंतीना ओल यायची ! सर्वांच्या तक्रारी , भांडणे सुरु व्हायची ! पण माझ्या आईला त्या आकारात कधी ...
दाढीधारी मुनी तप करतोय ! असे वाटे , तर कधी ..
साक्षात कृष्ण मेघ भिंतीवर अवतरले असे वाटे !
२ ) घरातील तान्हुल्याने दुपटे ओले केले ... तर... ती सहज म्हणे ... चिखलातलं कमळ आहे ग माझे ते !"
३) संडास सार्वजनिक होता ! नंबर लाऊन उभे रहावे लागे . कुणी चिडचिड केली तर ती म्हणे ... '" रस्यातील चालती बोलती चित्रे न्याहाळता येतात , बरचं काही टिपता येते "
खरच ... आईने रसिक कलात्मक दृष्टि तून ... एक स्वानंदी समाधानी सृष्टि निर्माण करता येते ... हे सहज सुंदर संस्कार केले . ... अशी दृष्टि कलाकारात हवी  !
नाहीं का ?
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme