सोनोपंत दांडेकर...

वारक-यांच्या जंगम विद्यापीठाचे कुलगुरु ... सोनोपंत दांडेकर !!! जाती.. प्रजाति ला मुठमाती देऊन, बुद्धि ला श्रद्धेची जोड देऊन ... घराघरातून ...  वारकरी तयार केले ! ठिकठिकाणी किर्तने करुन ... मानवतेची पताका फडकवली ! ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा दोहोंचे संपादन करुन , मनामनात ज्ञानबीज पेरले !
अथक मातीत राबणा-या कृषिवलाच्या हातात टाळ , मुखात नाम देऊन मन रिझवले , साक्षर केले ... सुश्रृत केले  ! तुरुंगातील कैद्यान शिक्षण दिले !
दुष्टचक्राला भेदून इष्टचक्र निर्माण करणा-या या थोर विभूति ची आज पुण्यतिथि!!!
आज  पावसाच्या सरीअन् वारकरी ... हासत ... नाचत...
हरिनामाच्या जल्लोषात ... त्यांचा मार्ग अनुसरत आहेत...
ज्ञान दिप तेवत आहे ... मनामनात !!!
श्री हरि विठ्ठल ... जय हरि विठ्ठल  ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme