उंच मनोऱ्याच्या पायाशी...💐

उंच मनो-याच्या पायाशी ..
झोपडी माझी छोटीशी ।
हाताची करुन ऊशी ...
कांता नीजे डाव्याकुशी ।
पोटाला चिकटे पाठ ...
दैवाची अगाध गाठ ।
सूर्य आग ओकतो ...
बाळ गालात हासतो ।
गटार गंगा वाहते ...
पोर आनंदे नाचते ।
बाहेर अथांग सागर ..
घरात नाहीं घागर ।
चूल झाली थंड ..
तिने पुकारले बंड ।
उपाशी आहे पोर ...
दाराशी मुके ढोर ।
आंसू गळून आटले ..
वस्त्र पुरे फाटले ।
परी आहे एक आस ...
पोर .. शिकेल खास ।
चार पुस्तके वाचेल ...
झोपडी माझी तरेल ।
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme