ओढा...
⛷ओढा...
खडबडीत खडकातून..
दलदलीत चिखलातून..
डोंगराला घालून वेढा..
धावतो हा खट्याळ ओढा !
अवखळ ओढा, ओढ लावे वेडा ।।
झेपावत कड्यावरून..
ऊसळत दरीतून...
रानाला घालून विळखा..
खळाळतो.. हा.. निसर्ग सखा !!!
अवखळ ओढा, ओढ लावतो वेडा ।।
चमचमत वाळुतून..
सळसळत पानातून...
ओसंडत.. दुग्ध धारा..
करतो अजब इशारा !!!
अवखळ हा ओढा, ओढ लावतो वेडा ।।
उन्नती गाडगीळ 🌹🙏
खडबडीत खडकातून..
दलदलीत चिखलातून..
डोंगराला घालून वेढा..
धावतो हा खट्याळ ओढा !
अवखळ ओढा, ओढ लावे वेडा ।।
झेपावत कड्यावरून..
ऊसळत दरीतून...
रानाला घालून विळखा..
खळाळतो.. हा.. निसर्ग सखा !!!
अवखळ ओढा, ओढ लावतो वेडा ।।
चमचमत वाळुतून..
सळसळत पानातून...
ओसंडत.. दुग्ध धारा..
करतो अजब इशारा !!!
अवखळ हा ओढा, ओढ लावतो वेडा ।।
उन्नती गाडगीळ 🌹🙏
Comments
Post a Comment