गुरू पौर्णिमा..


आधुनिक गुरुपौर्णिमा..

वाढदिवस हा गुरु व्यासांचा..
सत्कार करुया सर्व गुरूंचा ।

प्रथम नमन माता माऊलीला..
बाळा.. जपणाऱ्या क्रुपा सावलीला।

नमस्कार त्या रविराजाला..
आद्य गुरु तो पहिला वहिला ।

वंदन करु भू मातेला..
चराचराच्या निर्मितीला ।

जलाविना ना अर्थ जीवाला..
बचत करुन वाचवू जीवनाला ।

झाडे लावुन रोखू प्रदूषणाला..
खेळवत ठेऊ शुद्ध वायुला ।

निसर्ग गूरुची अजब लीला..
लीलया सुखवती सकला ।

स्मरण करून गुरुवर्मांचे..
रक्षण करुया भूमातेचे ।।


प्राचीन गुरुकुल 


श्री गुरू पौर्णिमा..
उपनिषदांवरून गुरुकुल पद्धती आली.
एकेका ऋषींचे आश्रम एकेक विद्यापीठ होय !!!
* धौम्य व शौनक ऋषींच्या आश्रमात .. शेतीशिक्षण.
* वसिष्ठ व जमदग्नींच्या आश्रमात.. धर्म विद्या.
* मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात.. धनुर्विद्या.
*भारद्वाज ऋषींच्या आश्रमात.. यंत्र विद्या व विमान विद्यादान.
* चरक, सुश्रुत ऋषींच्या आश्रमात.. औषध विद्या.
* भरतमुनींच्या आश्रमात..
न्रुत्य.. गायन.. वादन विद्या.
* गौतम ऋषींच्या आश्रमात.. स्रुष्टी नियम.
*कणादऋषींच्या आश्रमात.. अणू..परमाणू.. चे सिद्धांत, तरंग वाद इ. शिक्षण.
* नारदमुनी आश्रमात..भजन,किर्तन, इ.
* कपिल मुनी आश्रमात.. आध्यात्म विद्या.
* पतंजली आश्रमात..योगदान.
* भार्गव ऋषींच्या आश्रमात..युद्ध कला.
*शांडिली व कौंडिल्य आश्रमात.. व्यापार .
*शाकुनेय आश्रमात.. पक्षी, प्राणी, निसर्ग इ.
* वात्सायन आश्रमात.. कामशास्त्र शिक्षण.
* कौशिक व मारिच आश्रमात..नौका व समुद्र विद्या.
*अनेक आश्रमातून चौदा विद्या व 64कलांत निपूण करून , अतीव कडक परीक्षा घेत असत.
गुरुकुलात विद्या फुकट असे पण सेवा, स्वावलंबन, कडक नियम, उच्चार , विचार, तात्विक व प्रात्यक्षिक पक्की बैठक, आरोग्य, व्यायाम, आहार विहार इ. बाबत कडक नियम, नियोजन, नियंत्रण पाळावच लागे.
देशप्रेम, वर्तन शास्त्र यावर भर असे.
सात्विकता.. बहुगुणसंपन्नता आपोआप मिळत असे.
आज आपण वरील सर्व गुरूंना मनोभावे शतनमन करुया..
*** हा लेख.. उपनिषदांवरून वेचला.***

उन्नती गाडगीळ 💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme