श्रश्रावण.. मनभावन..
....श्रावण.. मनभावन....💐
रश्मींना छेडत, सरींना शिंपत...
... येई.. रंग रसिया...।
दिशांना रंगवत, रंगफुले उधळत...
... खेळे... खेळिया...।
लडिवाळ वेलींचे, .. गर्द व्रुक्षा वेटोळे...
अवखळ कलिकांचे.. सर्द सावळे हिंदोळे ।
हरित पर्णांची पुंगी.. नागोबाचा.. पिंगा..
इंद्रधनु छत्रीखाली.. बालगोपालांचा दंगा ।. चौखुर बागड... त्रुप्त हंबर.. पाचूच्या रानी ...
लाली पसरत.. गाली .. हासे.. वासरमणी ।
पंख पसरुनी भिरभिरती.. सानुले पक्षी..
निल पटलावरी.. रेखती.. सुबक नक्षी ।
क्रुष्णमेघ मल्हार आळवी.. गोप दही हंडी सजवी..।
सागर लाटा गगन चुंवती..
श्री.फल.. दीप.. संग नाचती..।
क्रुषीवलाची मधुर भल्लरी..
बैलपोळ्याची रंगत न्यारी ।
पंचतत्व खुलवी.. झुलवी त्रिभुवन..
श्रावण सखा.. मनभावन !!!
उन्नती गाडगीळ 💐

Comments
Post a Comment