भक्ती गीत..

एक.. भक्ती गीत..
देह मंदिरी, ह्रदय सिंहासनी
हस्त जोडुनी, मस्तक लवुनी,
साssद घालते तुला..
ये अंबे मज भेटायला..।

ये अंबे... ..
संस्काराचा शेला लेऊनी
सद्गुणांची कास धरूनी..
दीsssप उजळला...
ये,अंबे मज भेटायला।

ये, अंबे...
विकारांचे खंडन करुनी,
विचारांचे मंथन करुनी,
गंsssध दरवळला...
ये , अंबे मज भेटायला।

ये.. अंबे...
धमनीचा धागा घेउनी..
स्पंदनांची फुले ओवुनी..
भक्ती रंsssग रंगला...
ये अंबे मज भेटायला..
ये.. अंबे.. ...
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme