सुवर्ण मध्य...

🐤काल समीर चा.. ,msg..
मँडम, खूपच भय वाटते. माझ्या मुलाचा इ. 10वी चा निकाल जवळ आलाय.. रागावलो.. संतापलो तर पोरगं जीवाच काही करेल हे भय! न रागवावं तर.. पैसा.. वय.. वेळ .. ???
मँडम, आम्हाला आमचा बाप गुरावानी मारायचा.. पन् त्याला भय नव्हते.. पीरगं जीव देईल वगैरे..
आता काय करावे, तुम्ही च सांगा...

Msg.. पाहून मन सुन्न झालं !!!
,पुढची पीढी.. धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतयं !
पाण्यासम पैसा जातोयं..अन् गुणं कितीही मिळवले तरी किंमत नाही हे ही खरं!!!
यंत्रयुगात आपणही यंत्रच व्हावे.. मौन साधावे..स्वतःचे  हातपाय बांधून गप्प रहावे.. पाठीवरून हात फिरवत ..त्याचे मित्र व्हावे.. नाते घट्ट करावे.. वर्षे.. वेळ.. पैसा.. पेक्षा तू जास्त महत्त्वाचा.. म्हणून.. पंखात बळ। द्यावे..
इ. 12वी तरी झाले च पाहिजे समजवावे.. अनेक पर्याय समोर ठेवावे.. आपली आवड बाजूला ठेवून त्याला निवड करू द्यावी..
एक दिलाने.. खेळीमेळीने..सुसंवादाने.. परस्पर विश्वास बाळगावा.. विकास आपोआप होईल..
आपण मुलांना घाबरू नये.. अति धाक नसावा.. अन् अति मोकाटही सोडू नये..
सामंजस्य हवे..
उन्नती गाडगीळ 🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme