...ळ..चा खेळ...
श्री. महेश पेंढारकरजींनी..
माझ्या एका कवितेवर कौतुक सुमने उधळली,
' यमक जुळवताना.. सतत आलेला .. ळ.. अन् शेवटी नावात आलेला ..ळ .. सुखद.. शब्द खेळ" वगैरे।
अन् एकदा माझी अमराठी सखी म्हणाली.. ळ..बहत मुष्किल है.. उसकी जगह.. ल.. चलेगा ना ?
तर.. नाही.. हे माझे ठाम मत आहे.. चला.. मनाशी विचार करून बघा बर...
ळ चे स्थान किती अढळ आहे ते...
मराठी लावते.. लळा.. जिव्हाळा.! उगवते.. सकाळ.. उमलते कळी.. पानांची सळसळ.. आंतरीक कळकळ.. तळमळ.. त्यातून चळवळ.. वळवळ.. उमाळा.. भाळीचा चंदन टिळा.. फुललेला मळा.. गाता गळा.. धारदार विळा.. वर्ण सावळा.. घन नीळा.. सुगंधी वाळा.. काळा फळा.. गोजिरं बाळ.. पायी चाळं.. पाण्याचा नळ.. पाणी खळखळ.. पोटाच खळग भरण्यासाठी धावपळ.. रक्त भळभळ..
खुळं करणारी गालावरची खळी.. रमवणारा खेळ.. दुष्ट खेळी.. वेळी अवेळीचा पावसाळा.. त्रस्त करणारा उन्हाळा.. मस्त हिवाळा..
उंच अंतराळ.. खोल पाताळ.. सर्वत्र भरलेली पोकळी.. नारळी.. पोफळी.. केळी.. रंगिली होळी.. हातातील झोळी.. लाकडी मोळी.. तव्यावरची पोळी.. लिमलेट गोळी..
अनेक शब्द आहेत.. ळ जागी ल ठेवून अर्थ बोध होणार नाही.. असा हा .. ळ.. मराठी भाषेची शान .. खेळीमेळीने .. मिळून मिसळून.. मेळ घालतच राहणार सदासर्वकाळ..
श्री. महेशजींचे पुन्हा आभार मानते !.. ळ.. पुराण सुफळ संपूर्ण !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment