प्रेम
प्रेम
____________
९
८
सुमित.. एक उच्च शिक्षीत अधिकारी.. कश्मीरी युवक.. लाल गोरा.. हासरा.. लाजरा बुजरा..आत्मकेंद्री..
नाव विचारताच लाल नाजूक अधर पाकळीतून हळूच शब्द उमटले.. प्रभा !!!
त्यांच्या लग्नाला 2-3महिने झाले.. तरी. . ती उदास.. अबोध.. कुणाशी बोलणे नाही.. कणात मिसळणे नाही.. हरवलेली...
एक दिवस न राहवून मीच विचारले..
" प्रभा. क्या बात है?इतनी गुमसुम क्यों रहती हो ? जरा बाहर निकलो। घूलमिल जाओ.. काँलनीमे सभी मिलनसार है। "
एकदम.. माझ्या गळ्यात पडली.. मुसमुसत..
" दीदी, मैं एक उलझनमें हूँ। मेरा पती कौन है? सचमुच अफसर है ना.. कहीं चौकीदार तो नहीं ? वक्त.. बेवक्त.. रात देरतक आँफीस जाता है.. नाइट ड्युटी करता है.. कहीं मुझे फसाया तो नहीं गया?"
खूप विचारांती लक्षात आले की.. पहाडीप्रदेशातील.. सीमारेषेवरील मुली.. सततच्या दहशतवादामुळे..
७
प्रेमळ विनवणी
६
५
४
नाती प्रेमाची
३
एक सुंदर युवती
एक सुंदर युवती .. तिचा पती .. रुबाबदार ... पत्नीला दागदागिन्याने मढवणारा .. सतत तिच्या सौंदर्याचे गुणगान लोकांसमोर गाणारा , !
प्रीती चा खेळ असा रंगला ।
आज स्वर्ग धरेवर आला।।धृ ।।
कवेत तुझ्या भान हारपले ,
संवाद स्पर्श रुप जाहले ...
अबोल नाते मनात खुलले ...
खुलतो sss गार वारा sss
आज स्वर्ग धरेवर आला।।
झुकले अंबर, क्षितिज ही झुले ...
शुभ्र चांदणे कटी लपेटले ...
मन थरथरले , तन मोहरले ...
वाहतो हा प्रीत झरा ...
आज स्वर्ग धरेवर आला।।
विश्वात तुझ्या , आश्वस्त झाले ...
स्वप्न मनीचे सुगंध ल्याले ...
सुखसागरात धुंद न्हाले ...
हासतो सारा किनारा..
८
कश्मीर कन्या...
सुमित.. एक उच्च शिक्षीत अधिकारी.. कश्मीरी युवक.. लाल गोरा.. हासरा.. लाजरा बुजरा..आत्मकेंद्री..
दोन वर्षे आम्ही त्याला ओळखतो.. चार महिन्यांपूर्वी। लग्न झाले.. सपत्नीक आमचे घरी आला.. मी बघतच राहिले... साक्षात कश्मीर की कली!!! त्याला साजिरी.. गोड गोजिरी..लाजरी बुजरी.. सुंदरी !!!
नाव विचारताच लाल नाजूक अधर पाकळीतून हळूच शब्द उमटले.. प्रभा !!!
त्यांच्या लग्नाला 2-3महिने झाले.. तरी. . ती उदास.. अबोध.. कुणाशी बोलणे नाही.. कणात मिसळणे नाही.. हरवलेली...
एक दिवस न राहवून मीच विचारले..
" प्रभा. क्या बात है?इतनी गुमसुम क्यों रहती हो ? जरा बाहर निकलो। घूलमिल जाओ.. काँलनीमे सभी मिलनसार है। "
एकदम.. माझ्या गळ्यात पडली.. मुसमुसत..
" दीदी, मैं एक उलझनमें हूँ। मेरा पती कौन है? सचमुच अफसर है ना.. कहीं चौकीदार तो नहीं ? वक्त.. बेवक्त.. रात देरतक आँफीस जाता है.. नाइट ड्युटी करता है.. कहीं मुझे फसाया तो नहीं गया?"
तिच्या मनातील शंका.. कुशंका संपतच नव्हत्या...
खूप विचारांती लक्षात आले की.. पहाडीप्रदेशातील.. सीमारेषेवरील मुली.. सततच्या दहशतवादामुळे..
घरात कोंडून बसलेल्या.. सतत भिती.. फसवणूक.. हल्ले.. घातपात.. यामुळे.. आत्मविश्वास गमावलेल्या.. संवाद हरवलेल्या.. प्रत्येक पुरुषाकडे संशयीत नजरेने बघणाऱ्या.. अबोध..अजाण.. दुर्बल.. कलिका।
खरंच.. महाराष्ट्र कन्यका नसतील सुंदर.. पण.. सुरक्षित.. धीट.. सुसंवादी आहेत ना! खरचं भाग्यवान!!!
______________________________________________________________________________
प्रेमळ विनवणी
ती : सोड सख्या सोड ना ,
सिगारेट व्यसना ।धृ।
' पुत्र ' उद्या ' नीट ' ला बसणार ...
जाणीव ठेव ना !!!
सोड सख्या ....... ....
तो : बाल्यातील ' ती ' सखी ना ...
कशी सोडू तिला ... सांग ना ?
ती : ' कळी ' आता आली फुलाया ...
' वनमाळी ' बन ना !!!
सोढ सख्या ....
तो : चिंता या जाळती मना ...
' ती ' च आधार ना !!!
ती : चिंता आता नको मना ...
चिंतन कर ना !!!
उडे पैशांचा धुरळा ...
तन मन पाचोळा !
वैराण या मना ..
नवजीवन दे पुनः।
सोड सख्या .... .....
तो : सोडतो ... सोडतो ... या.. व्यसना ...
६
अंतर...
माझी स्नेह सखी दिपाली अन् मी ह्रदयांतर या शब्दावर चर्चा करत होतो.
दोघ़ींचे सूर जुळले.. दोन अंतरात एक सुसंवादी ज्योत तेवत राहिली...
अंतर=दूर, दुरावा..
अंतर= ह्रदय, ओलावा..
एकच शब्द.. अर्थात विरोधाभास...
उदा. ती त्याच्या प्रेमाला अंतरली आहे.
या उलट उदा. प्रेमाने त्या दोघांची अंतरे एक झाली !!
अंतर या शब्दात एकेक शब्द मिसळला की भावनिक आशय निर्माण होतो...उदा.
अंतर्गत. अंतर्भाव. अंतर्भूत. अंतर्नाद. अंतर्राष्टीय. अंतर्देशीय. अंतर्बाह्य. अन् सर्व परिचित... अंतर्जाल..
अनेक अंतरे एकत्रित करणारे.. मोहमयी जाळे !
दूर.. दूर असणाऱ्या आपल्या व्यक्तीला.. दु:ख झाले.. तर त्याची कळ आपल्या अंतरात उठते..
वळ मनावर उमटतो.. अन् भेटीचे बळ मिळते.दोन अंतरे न राहता.. एक अंतरंग बनते..
हे तरंग.. कधी जीवाचा कान करतात. तर कधी नयनातून आंसू रुपे ओघळतात..
दोन्ही अंतरांना एक विलक्षण ओढ असते.. एक होण्याची.. मग त्याला जोड मिळते.. msg.. email.. mobile. ..यंत्राची.. तंत्राची !!!
मित्रहो.. आपलेही तस्सेच आहे ना.. शब्द.. वाचण्यासाठी.. अवघी अंतरे एक होतात.. नाही एखादी post वाचायला मिळाली की चुटपुट लागते हो ना ...
वारी... उत्तम उदा.
अनेक अंतरे(योजने)पार करून.. अनेक अंतरे ( ह्रदये) एका श्वासात जयघोष करतात. . टेकतात माथा !!!तेव्हा अनंत अंतरांची होते.. एक गाथा !!!
अवघा रंग एक झाला!!!
उष:काली.. लाल पटलातून.. पहिले सूर्य किरण धरेवर.. अवतरते तेव्हा.. अवघे चराचर थरथरते.. पंचत्व एकतत्व होऊन सलाम करते...
तर.. या वेगवान युगात.. वेळ काढून.. वियोग मोडून.. योग साधून.. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणे, वेळ देणे जरुरी..
तांत्रिक.. यांत्रिक न बनता..स्थानिक अंतरे पुसून... अंतरे (ह्रदये) सांधुया..
अंतरी एक रंग फुलवुया...
_____________________________________________________________________________
चित्राकडून.. शब्दाकडे..
हर्ष..मातृत्वाचा
हे चित्र बघताच.. आठवला.. तो.. भयाण दिन.. अन् अवचित गवसलेला.. हर्ष !!!
4डिसेंबर 1974...
मी सकाळी नैमित्तिक व्यवहार सुरळीत केले, पोथी.. जप व ज्ञानेश्वरी पठणकेले...
मी माहेरी गेले होते.. गोड कामासाठी.. सर्वांसाठी उपमा केला.. भाजी चिरुन ठेवली.. नाष्टा आम्ही हासत खेळत पार पाडला अन् मी तुळशी बागेत गेले.. तेथे एका प्रौढेने मला पेढा दिला.. प्रसाद घे. खाऊन टाक..
मी पटकन तोंडात टाकून घरी आले..
आजोबा म्हणाले ,
" उद्यापासून एकटी नको जाऊस.. जपून रहा. बर..
मला स्नानासाठी पाणी दे!"
आईने खूणेने मला नको केले व तिनेच त्यांना पाणी काढून दिले.
मी त्यांच्या संध्येची तयारी केली.. (तपशील सारा दिला कारण मी किती ठणठणीत होते)
आजोबांची 2-3 आचमने जेमतेम झाली असतील..
अन् मी खूपच किंचाळले..
तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला..
मला आठवा महिना होता..
सारेजण खूपच घाबरले..
धावपळ.. सलाईन.. 4-5तज्ञ डाँ. आले.. त्या काळात सोनोग्राफी नव्हती. सासुबाई व आजी म्रुत्यूंजय जपाला बसल्या.
माझे पोट सरसर उतरले..
डॉ. म्हणले.. बाळाचे ठोके लागत नाहीत.. सारे संपले असे वाटते..
मी म्हणाले,
" आई मी होणार आहे. अन् मला बाळाची चाहूल लागते आहे. "
त्याच काळात सिझेरियन शब्द रुजला होता..
आजोबा म्हणाले,
'' उन्नती व बाळ वाचणारच! ती रोज ज्ञानेश्वरी वाचते. करा आँपरेशन..
पण डॉ. म्हणले... हाती काही लागणार नाही..
शेवटी.. मुंबई हून अजून दोन डाँ. आले.. डाँ. परांजपे !!!
ते मला म्हणाले,
" बाळ, तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते , पण.. फक्त तुझ्या पोटावर जखम आम्ही करणार पण तुला बाळ देऊ शकणार नाही ग!"
मी म्हणाले," माझे बाळ मला मिळेलच !"
5डिसेंबर1974..
अन् आँपरेशन सुरु झाले..
त्या काळचे सिझेरियन सोपे नव्हते..
बाहेर.. सारे रडत होते..
अन् अचानक टँsssहा..टँsssहा स्वर उमटला...
कुणाचाच अगदी डाँ. चा सुद्धा विश्वास नाही बसला.. चमत्कार घडला.. बाळ सुरक्षित ...
अकल्पित पणे खजिना हाती लागला..
एक मखमली लुसलुशीत पांढरा शुभ्र गोजिरा.. गोळा माझ्या जवळ नर्सने ठेवला..अन्.. माझी न मी राहिले..
काळ्याशार गर्भातून.. उमललेलं..थरथरतं.. लवलवतं.. गवताचं ,पातं..
हा.. हर्ष..काळ्याकुट्ट अंधारात.. उगवलेली चांदणी.. हर्षोत्फुल्ल क्षण !!
नाती प्रेमाची
🌸एक इलेक्ट्रिशियन पाहिजे. जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्ह एकदा कनेक्शन जोडून देईल.
🌸एक ऑप्टिशियन पाहिजे जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल.
🌼एक कलाकार पाहिजे जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्ययाचे रेषा रेखाटू शकेल.
🌸एक बांधकामगार पाहिजे जो दोन शेजाऱ्यां मध्ये उत्तम सेतू उभारू शकेल.
🌼एक माळी काका पाहजे जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल.
🌸एक प्लंम्बर पाहिजे जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल.
🌼एक शास्त्रज्ञ पाहिजे जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल.
🌸आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक शिक्षक पाहिजे जो एकमेकांशी संवाद कसा साधायचा ते शिकवू शकेल....!!
____________________________________________________
एक सुंदर युवती
एक सुंदर युवती .. तिचा पती .. रुबाबदार ... पत्नीला दागदागिन्याने मढवणारा .. सतत तिच्या सौंदर्याचे गुणगान लोकांसमोर गाणारा , !
पण एकांतात ... " जर तुला कुणाचा मोह झाला तर , ही पिस्तुल तुझ्या ठिक-या ठिक-या करेल ! " असे धमकवायचा ! " तू याच्याशी परत बोलताना दिसलीस तर.... पिस्तुल ....
सतत ती बिचारी धास्तावलेली ! खंगत चाललेली !
ती गर्भवती राहिली तरी ,
" मुलगा झाला तर ठिक नाहीं तर... पिस्तुल !"
दडपलेल्या तिने एकदा , पिस्तुल बघीतले तर ते खोटे , खेळातले पिस्तुल होते !!!
नुसतीच पोकळ धमकी! न्यूनगंडाने , संशयाने ग्रस्त, त्रस्त व्यक्ति ... दहशतवादाने मनोरुग्ण वाढवतात ! एखाद्या कुटुंबाला उद्धवस्त करतात !!
दहशतवाद हा सुप्त ज्वालामुखी!! फोफावलेला चंगळवाद , लालच , न्यूनता, स्पर्धा, व्यसनाधीनता ,इ. तून निर्माण होतो . अनेक मार्गे दहशतवाद घराघरात घुसत आहे, मनोरुग्णांची वाढती संख्या ही जागतिक चिंतेची बाब आहे. प्रत्येकानेच चिंतन केले पाहिजे की , आपल्या वर्तनातून , स्वरातून , वृत्तितून , चालीरितीतून , मनोरुग्ण तर तयार होत नाहींत ना ?
विशेषत: तरुणाई घरात वावरत असताना ,जास्त खबरदारी घेऊया ! मनोरुग्ण बनवण्याचे यंत्र आपण नको व्हायला !!! " दहशतवाद विरोधी दिन " सततच पाळुया ! हा संस्कार लेवुया !!
____________________________________
२
टाँम अन् जेरी...अनोखी प्रेमकथा
( पुणेकर टाँम व हंगेरीयन जेरी यांची.. live.. in.. relationship )
टाँम : ओss जेरीss प्राणेश्वरी.. माझी लाल चेरी.. टपोरी स्ट्रॉबेरी.. बाणेरी.. काटेरी.. बोरी.. हे..हंगेरी सुंदरी.. ही घे.. माहेश्वरी सारी.. हे.. गोरी.. हे तुजसाठी.. शंभर नंबरी.. सोनेरी.. गळसरी..
अन्.. हा ..जोडा.. पुणेरी !!
जेरी : 0! So nice.. (I love you त्याच्या गळ्यात पडते . आजुबाजुतून.. शिट्ट्या )
टाँम : जेरी , आपण भारतीय संस्कृती.. संस्कायानुसार.. स्पर्श सुद्धा न करता एकत्र राहायचे..
जेरी : 0.. Tom.. I can't live with out your touch. .. pl. come.. hug me !!!
टाँम : हे.. हग् .. वगैरेचा उच्चार सुद्धा येथे चालणार नाही.. शुद्ध मराठीच बोलायचं!!
जेरी : OK.
टाँम : मराठी.. बरं म्हण.
जेरी : बाँssर !
टाँम.. प्रत्येक शब्दावर चंद्र बिंदू नको..
जेरी : O.M.G.
टाँम: मराठी...
जेरी : अरेरे.. माज्या देवा..
टाँम : अरेरे.. नाही ग.. काही वाईट घडले तर रेरे.. अन्यथा एकदाच रे..
नवल वाटले की .. अरे !
जेरी : नाँवल.. means book? ज्याऊ देना.. च्यायला ये.. अन् गाँराम कचेरी .. खाँयाला .. ये.
टाँम : कर्म माझं ! जेरी.. च्यायला नाही ग.. ही शिवी आहे.. चहाला ये म्हण ..अन् कचेरी नाही ग.. कचोरी !
जेरी : बाँssर ..
टाँम : परत चंद्र बिंदी आली...
जेरी : (वैतागून.. सिगारेटचा जोरदार झुरका घेते ) ..
टाँम : जेरी.. हात जोडतो..पाया पडतो.. पण..धुराडी नको ना.. अग.. हा वाडा। आहे.. संस्कार..
जेरी : हे.. नाँय.. ते.. नाँय.. मग कराँयाचा काँय ? You bloody fellow.. I hate you. . You are not my boss.. Understand ? I am leaving you right now. ..
टाँम : (तिच्या पुढे गुडघे टेकून बसतो ) तालात गातो ..हवा.. येऊदे.. जरा.. हवा येऊदे.. दशदिशातून.. हवा येऊदे.. जेरीच्या गाली .. चेरी. .. खुलू दे.. राग.. जाऊ दे.. जरा.. खुशी.. फुलू दे.. टपोरी स्ट्रॉबेरी.. घुमू दे.. राग .. जाऊ दे.. रात फुलू दे.. हवा येऊ दे..
जरा.. सुख.. लाभू दे...
खोलीभर.. नाचतो।
जेरी खुदुखुदू हासते.
जेरी : टाँम, मी रागवूच शकत नाही तुजवर ! मी तुझी प्रेमीका..
मी.. ज्योती.. तुझे आदर्शवाद.. ऐकून होते.. ते खरे की खोटे बघायला मी.. जेरी.. झाले!
आज पटलं.. तू खरा खरा संस्कृती.. रक्षक !
टाँम : होय जेरी.. ज्योती..Live in..एकमेकांना समजून घेणे.. ओळखणे..एक.. मनोमिलन.. त्यात विषय.. वासना नाही.. पवित्र प्रेम..
जेरी: आता सहा महिने झाले.. live in. ..आता पूर्ण सावध तर आहोतच .. तर.. तर.. आँsssता..
टाँम : नको.. चंद्र बिंदी..
झटपट.. विवाह.. अन् मग..मधुचंद्र...
सर्वांनी या.. हं.. लग्नाला !!!
१ तो... रंगीढंगी..
तो... रंगीढंगी.. पण .. हळूवार.. तिच्या वर भरभरून प्रेम करणारा.. सतत तिला जपणारा.. कुणाची तमा न बाळगता.. तिला बाहुपाशात घेणारा.. तिचाच थ्यास.. तिचीच आंस.. मनी बाळगणारा.. सच्चा.. प्रेमी..।
अन् .. ती...
ती.. 2wheeler वाहिनी... Mobile धारिणी.. स्वैर पक्षिणी.. गाँगल धारिणी..
बिनधास्त.. निर्धास्त.. !
आँक्टो. मध्ये.. तिला जायचे होते.. सेमिनारला..
फुलपाखरी रंग धारण करून.. त्याचे आर्जव झुगारून.. त्याला खिजवून.. त्याला झुरत ठेवून.. ती.. मर्दानी.. बाइक वर स्वार होऊन.. गेली.. तोऱ्यात.. झोकात.. दरीखोऱ्यात..
खूप खूप भिजली..झिम्माड अकाली पावसात ! आजारी पडली !
तो... खूप खूप दुखावला.. गुपचुप बसला.. आसुसला होता तो.. तिला कवेत घ्यायला.. पण.. तिनं झिडकारलं.. तोही रुसुन बसला.. गट्टीsss फूsss ...
अन्। काल अचानक.. गार गार वारा.. पाऊस धारा..
तिचे कपडे.. मेकअप .. बिघडून चालणार नव्हते..
तिने त्याची मनथरणी केली..तो.. ढम्म !!!
तिने बाइक स्टार्ट केली..
हळूच तो आला.. मागे बसला.. अन् कुणाचीही पर्वा न करता.. त्याने तिला बाहुपाशात घेतले...
खूप खूप काळजीने...
कारण.. तो.. रेनकोट होता हो !!!😃
उन्नती गाडगीळ 🌹🙏











Comments
Post a Comment