मी..एक..स्त्री..भ्रुण..

🙋 मी ... एक स्त्री ..भृण ...🌷
.... कालपर्यंत मी सुरक्षित होते मातेच्या उदरात ...
वाढत होते मजेत ... लाडाकोडात ।
आज .. *मुलगी होणार * यंत्राने केले भाकीत ...
माझे पिताश्री ... पितामह .. सारेच झाले क्रोधीत ।
गरजले " मुलगी ... छातीवर धोंडा ! कुठून आणु हुंडा ?
त्या पेक्षा स्वी बीज  उखडून टाका ! तिला.. मारा .झोडा ।
उद्या माझी रवानगी होणार आहे .. स्वर्गात ...
माझ्या सह अनेक बीजांकुर खुडले जातील गर्भात ।
स्त्री विना पृथ्वी कशी दिसेल भकास ?
कल्पनेनेच मन झाले उदास उदास !
गा-हाणे मांडते मी  .. जन दरबारात ...
जन हो ... जाणता ना तुम्ही कायदा ..
मग , करा .. मजशी एक वायदा !
स्त्री भृण हत्या थांबवा ...
लिंग चाचणीतून वाचवा ...
एकच मागणे मागते ... जाता.. जाता ..
आजच वाचवा ... उद्याची माता  !!!
तुमची ... नकोशी ...
मुग्ध कलिका !!!
उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme