अग्गोबाई... राई...( धम्माल )
🕴🏼अग्गोबाई...राई..
सूपात धान्य घोळवणे.. नाचवणे..आसडणे..पाखडणे.. अन् फुंकरुन पाखड उडवणे.. अन् उडालेल्या पाचोळ्याचे नर्तन बघणे.. ही माझी आवड .. भूज वास्तव्यात पूर्ण झाली..
भूजला आम्ही एक वर्ष होतो. छोट्या गावात पूर्वी निवडलेले धान्य मिळत नसे. खडेरं..पाकड युक्त धान्य मिळे.
असेच एकदा मी बागेत मोहरी पाखडत असताना.. शेजारचा चिटुकला मधु.. धावत आला.. आन्टी..आन्टी.. करत अन् मागून मला त्याने मिठी मारली.. मी दचकले.. सूप हेंदकाळले.. काळी गोल मोहरी.. लाल मातीत मिसळली .. मी .. अग्गोबाई.. म्हणून खूप खूप हासले.. त्याला जवळ घेऊन म्हणाले,
" कोई.. बात नहीं बेटे, चलो हम राई बोएंगे।"
मग खड्ड्यात राई पेरली..
त्याला अग्गोबाई.. म्हणजे राई वाटले.. रोज तो यायचा.. अग्गोबाई को पानी दिया ?विचारायचा..
त्याची अग्गोबाई.. राईला कोंब फुटले.. मधुची कळी खुलली.. कोवळी पाने फुटली.. पिवळ्या फुलांनी क्षेत्र बहरले.. मधु टाळ्या पिटू लागला.. मला ओढून नाचू लागला.. हीच भल्रर असावी..काही दिवसात हिरव्या गार नाजूक शेंगा बघून मधु अन् मी मोहरलो.. नंतर शेंगा सूर्य रंगाने रंगल्या.. सोनपिवळा शालू ल्यायल्या.
एक शेंग मी खुडून बघीतली.. काळे गोल तुकतकीत दाणे..एका रांगेत बसलेले ! ओहो !काय ही देवाची रचना ! निसर्गाची किमया !!!
हजारो शेंगा.. उन्हात.. झाडावर तळमळत होत
या.. आम्हाला काढा.. विनवत होत्या..मी शेंगा तोडाया लागले.. 2-3तास खपले.. घामाघूम झाले.. रापले.. शेतकऱ्याच्या कष्टाचे मोल जाणले.. 3 दुरड्या भरल्या.. पुढे काय ?
हजारो शेंगा.. एकेक शेंग सोलायला बसले.. किचकट काम.. बोटं लागली दुखायला.. इतर कामे राहिली.. क्लासची मुले खोळंबली..
सारे आवरून एक सूचले..
एका पिशवीत शेंगा भरल्या.. व लाटणे फिरवले.. त्या शेंगा महा चिवट व चावट.. मग अलगद दगड फिरवला.. हायरे दैवा !!!
पिशवी उघडली.. तर.. गोल काळी मोहरी गायब ! अन् काळी पाखडं..अन् पिवळी डाळं !!!
पुनः सूप मदतीला धावले..
आता काळी पाखडं फुंकली.. व सोनपिवळी डाळ घोळली.. अतीव आनंदाने.. सूपाच्या तालात.. बोटांच्या ठेक्यात.. अंगठ्या.. जोडव्या.. साखळ्या सह मी पण नाच नाचले..
काळी पाखडं मातीत मिळाली.. पिवळी धमक राईची डाळ .. काचेच्या बरणीत भरली..
त्यावर्षी.. घरी.. दारी.. शेजारी.. पाजारी.. सासरी.. माहेरी... स्वकष्टार्जित डाळीचे झणझणीत लोणचे बनले..
मधु मात्र.. अग्गोबाई.. राई..करत बसला !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment