' स.न.वि.वि. ' या ग्रूप मध्ये सामील झाल्या पासून.. आजन्म विद्यार्थी रहावे । या उक्ती ची प्रचिती येते. नित्य नेमाने कसोटी घेतली जाते व आपोआप बुद्धी ला चालना मिळते. मन सदावर्त राहते.या मानसोपचाराबद्दल मी .. स. न. वि. वि. .. ची शतश: आभारी आहे.
आजही असेच एका ताईने..अक्षरांंचे ठोकळे ( block s) माझ्या समोर ठेवले.. अन् मोत्यांची माळ बनवायला सांगितले..
मी अक्षरांना आंजारले.. गोंजारले.. पण.. अं..हं!!!
अक्षरे निगरगट्ट !!!
मग मी नाक उडवत.. वर्णांना खुणावले..
त्यांची अंगडी.. टोपडी बनवली.. ठसठशीत चार दागिने घातले.. विरामचिन्हांची पावडर.. तिट्टी लावली.. अन् गणरायांना विनवले...

 लेखणी चाले तुरुतुरु..
वाणी बोले चुरूचुरू ..
पण, अबोध सारे काही..
गणराया, तू शब्द दे अर्थवाही।
वारा वाहे रुणुझुणु..
धारा, झरे रिमुझिमू..
फोल सारे काही..
गणराया, तू मेघ दे
 जलवाही।
उन्नती गाडगीळ 🌹
अशी झोकात सही करून .. श्रद्धाताईला पेपर दिला..
तर.. वा.. छान असे तोंडापुरते तरी म्हणावे ना..
पण नाsssहीच मुळी !
ती.. स्वत: विद्याधारिणी !!!
त्यामुळे ती पटकन म्हणाली..
"अग, Eng.. अल्फाबेटस् चे कर ना काही तरी...
मग.. मी विनवले.. वरूण राजाला..
 Rain.. Rain..
Come again !
Roar.. With Cheers..
& Wipe our tears !
Rain. .. Rain...
Come.. again ..
We will dance with crops..
& Sing.. Sweet songs. !
Green ! Green!Green!
Win ! Win ! Win !
Unnati Gadgil 🙏🌹

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme