पहिलं वहिलं..💐
♥पहिलं वहिलं..
*आजि म्या..*(मी आजी जाहले..)
30एप्रिल2002या रात्री मी सुसज्ज हाँस्पिटलच्या सज्जात बसले होते.. हात उलटसुलट धागे घालतहोते..मन अखंड विष्णू सहस्त्र नाम जपत होते.. आत रुममध्ये..माझी पहिली वहिली लेक प्रसव वेदनेने तळमळत होती..
गर्द निशेच्या आवरणातून चंदेरी चंद्रकोर हळूच डोकावत..खुदुखुदु हासत काळजीने काजळलेल्या,मम मनाला धीर देत होती
..टक् टक् बूट वाजवत ..एकेक दिवा मालवत सिस्टर म्हणाली..
"मावशी आता झोपा. आज रात्री काही तुमची लेक बाळंत होत नाही...
चंद्र.. बिंब पण लपून बसले..
निराशेच्या आवर्तात मन घेरले..त्या मनाला गायत्री मंत्र आवर्तनात .. गुफले..
माझा मंत्रघोष चालूच होता..अचानक तांबड फुटलं.. पाखरं.. साखर स्वरात भूप आळवू लागले...
मी परत एकदा सहस्त्र नाम सुरू केले..
आणि...
" अभिनंदन!!! लेकीला मुलगा झाला!!!तुम्ही आजी झालात!!!'"
शब्दांसह.. माझ्या ओंजळीत .... एक गुंडाळी
ठेवली.. अहाहा...
गुटगुटीत यष्टी, गुबगुबीत गाल,गोरी तुकतुकीत कांती, आखीव भुवया,राजीव नयन,रेखीव अधर..
आणि.. माझी मी न राहिले!..
नकळत अधर पुटपुटले..
*आजि म्या ब्रह्म पाहिले!*
आज मी आजी जाहले!
हे ब्रह्म रुप बघायला सहस्त्र रश्मीनी नाचत..अमृत शिंपले आणि शुभाशिष दिले..
मी पहिल्या वहिल्या नातवासाठी अनेक बडबड गीते, बालगीते, जिंगल्स, पत्रे लिहीली..
एक विनवलं.. बाळा,अखंड वाचन, लेखन, चिंतन, मनन करून तुझ्या या मेंदू लाच संगणक बनव.
1मे चा तुझा जन्म.. कर्माचे मर्म जाण.दो करात विश्वाला कवेत घे. विज्ञान पंख लावून दो पदांनी भ्रमंती कर..मंथन कर.. आरोग्य संपन्न भव!
ज्ञान मय भव। यशस्वी भव!तेजस्वी भव!
मी त्याच्याशी संवादत होते.. तो इवले डोळे मिचकावत.. जीवाचे कान करून ऐकत होता..
हे माझं पहिलं वहिलं नातवंड..
घेऊन अवतरलं माझ्याच लेकीचं रुपडं।
गोंडस.. राजस..पहिलं वहिलं..
जणू .. देवानं धाडलं.. गोल्ड मेडलं!!!
उन्नती गाडगीळ🌹🙏
मित्रहो..आज म.टा.पुणेTimes..पान 7वर..मी आजी जाहले..
लेख नक्की वाचा हं!
उन्नती गाडगीळ💐

Comments
Post a Comment