लेखनाच्या प्रकाश वाटा..

*लेखनाच्या प्रकाश वाटा *
माझा गुरू...नेमणूक केलेला शिक्षक नेमून दिलेल्या विषयाचे आकलन करतो.पण.. गुरूची नेमणूक न करता, विषय न निवडता  .. आपल्या अंतरातील ज्योती ला उजळतो,व स्वतः संदीपन ठरतो..

माझ्या जीवनात तीन व्यक्तीनी माझ्या इवल्या पदांना.. पाऊलवाट दिली. त्यांची मी शतशः ऋणी आहे..

1) Rev.Fr. D.C.Kamat..

कँथलिक .. मी माझ्या लेकीला Jr.K.G. त प्रवेश घेण्यासाठी काँनव्हेंट स्कूल मधे गेले होते. फादरनी माझ्याशी तासभर गप्पा मारल्या. (सर्वानाच आश्चर्य वाटले.मी तेव्हा औ.बाद .. लोकमत मध्ये लेखन करत होते)

दुसरे दिवशी सकाळी अचानक शाळेचा शिपाई माझे दारात हजर..

"गाडगीळ मँडम.. तुमची सर्टिफिकेटस् घेऊन फादरनी बोलावले आहे.!!!

उडालेच मी!!!

मी गेल्यावर भली मोठी प्रश्न पत्रिका दिली.. ती मी सोडवली.. एकदम Shake. Hand करून.. शिक्षीका म्हणून नेमणूक केली.

महत्त्वाचे म्हणजे.. माझ्या लेखनाला सदैव खतपाणी घातले.. लायब्ररी ची चावी हातात देऊन.. खूप खूप वाचा.. इंग्रजी बाल कविता, बाल नाट्य.. लिहावे यासाठी विषय पुरवले.. एक समृद्ध जलजीवनपाट.. मिळाला.. त्या पाटात मनसोक्त डुंबून मी इंग्रजी,हिंदी.. वाचन केले.. इतर भाषांचा थाटामाट , सुरेख घाट बघून.. माझी लेखन वाट .. बहुभाषिक झाली..

मी तीस हून जास्त इंग्रजी जिंगल्स लिहीली.

दोन बालनाट्य लिहीली.. हिंदी एकांकिका लिहून सादर करून बक्षिसे मिळवली

2)परब सर.. मुंबई येथे शाळेचे सेक्रेटरी श्री. परब होते.. त्यांनी सुद्धा माझ्या लेखणीला जाणीवांची धार लावली..

त्यांच्यामुळे... माझे लेखन.. अगदी भारत रत्न.. कै. अटलजी, कै बाळासाहेब ठाकरे,

कुसुमाग्रज, शांता शेळके, श्री. शरद पवार.

वगैरे अनेक ज्येष्ठ सर्व श्रेष्ठ व्यक्तींशी संपर्क साधता आला.. आणि आपसूकच माझे लेखन beyond the wall झाले..

3) श्री. संजय पैठणकर..

वयाने माझ्याहून लहान, पण कर्तृत्वाने,विचाराने महान.. असे हे व्यक्तीमत्व !!!

मी निवृत्ती नंतर कधीतरी.. कथा, लेख मासिके, वृत्त पत्रे इ.त पाठवणे एवढेच. करत होते...

पण अचानक .. 12short web series चे निर्माते असलेल्या संजय सरांनी..

चक्क माझ्या एका बक्षीस पात्र कथेला ..

Short Film चे रुप देण्याचे ठरवले.

नुसते ठरवले नाही तर .. माझ्या अंतरात एक सुप्त वात होती.. ती मोठ्या खुबीने ,चेतवली...

कथा छान आहे.. आता पटकथा लिहा.. हं.. आता सार्थ गीते लिहा..

असे बोलून, विश्वासाचे तेल घालून ती वात चेतवली..

आज.. आमची अनुबंध नामक शाँर्ट फिल्म तयार होते आहे..

माझ्या नावापुढे.. कथाकार, पटकथाकार, गीतकार.. अशी लेबले लागणार आहेत.

या नवतंत्र क्षेत्रातील हे माझे गुरू!

माझी सामान्य जीवन वाट.. प्रकाश वाट बनवणाऱ्या.. समाधान, शांतीचा दीप प्रज्वलित करणाऱ्या माझ्या गुरूंची मी शतशः ऋणी आहे.

उन्नती गाडगीळ💐

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme