नववर्ष..बाळ..💐

🙋 विश्वाच्या कुशीत विसावणारे ,प्रत्येक दिनाच्या अंकावर खेळणारे हे बाळ संख्या त्मक रुप धारण करते . !वसुंधरेच्या या बाळाची तारीख ठरलेली १ जाने ! व निर्वाणाची ३१ डिसें !
विजेच्या लखलखाटात , मद्याच्या धुंदीत ,वाद्याच्या तालात ,नाचत गात निरोप  व स्वागत उत्सफुर्त होते  .
नव वर्ष नामक वैश्विक बाळ म्हणजे नुकतेच फुटलेले केळीचे पान! मऊ लुसलुशीत कोवळी पिवळी हिरवी सुरळी ! ही सुरनळी चराचराच्या अंगा खांद्यावर खेळत रहाते . भिंती कुडाच्या वा महालाच्या ! या बाल मुठीत मानवाचे भवितव्य दडलेले असते !

उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme