मैत्र जीवाचे..💐

👩‍🎤मैत्र जीवाचे..

एका नामवंत मंदिरात *गीता जयंती* निमित्ताने भजन आयोजित केले होते. आणि भगवद्गीतेवर भाष्य करत निवेदन करण्याचे अवघड काम माझ्याकडे होते..

हे निवेदन आव्हानात्मक. म्हणून मी सार्थ लेखन करून शब्दांची लय,ताल ,डौल,,पोत संभाळत वाचन करण्याचा भरपूर सराव केला होता..

कार्यक्रम दुपारी 4ते6 होता.

दुपारी दिड ला जेवण झाल्यावर मागचे आवरणे,साफसफाई करणे चालू असताच..
अरुण भाऊजीं(ह्यांचे मित्र)चा फोन...

"वहिनी, आम्ही दोघे तुमच्या घरी साडेचारला येतो.. चहा ,गप्पा टप्पा करुन मग मुंबईला जाऊ!"

अरे बापरे!!!
निवेदन माझे आहे, म्हणजे मला जायलाच हवे.

हे म्हणाले,
"तू जा.. मी चहा बिस्किटे देउन त्यांना."

पण..दोन.. तीन तास आधी सूचना दिलेल्या पाहुण्यांची फक्त चहावर बोळवण करणे पटेना..
आणि तसं जवळपास काही पटकन मिळत नाही.

मी पटकन उपमा केला.मायक्रो बाऊल मधे काढून ठेवला.
तीन पोळ्या भर्रकन मिक्सर मधून काढून, तूप गुळ ,भरपूर सुकामेवा, वेलचीपूड घालून सहा, सात,लाडू करून ठेवले.

वामकुक्षी ला सुट्टी दिली. आणि चारला मला न्यायला कार आली. मी गेले. मनात समाधान होते.

आमचा कार्यक्रम साजिरा झाला.. प्रेक्षक एकदम भारावले.. मजा आली.

घरात माझ्या पतीने .. गृहस्वामी भूमिकेत शिरून, उपमा गरम करुन दिला. लाडू .. चहा ,बिस्किटे..
गप्पा, टप्पा..

मी रात्री उशिरा फोन करून भाऊजी,वहिनी ची क्षमा मागितली.

अरुण भाऊजी, वहिनी दोघांनी .. उपमा छान होता अन् काय ग.. लाडू काय सोळासोमवारचा प्रसाद होता का ग..
एकदम फर्स्ट क्लास..
आम्ही फडशा पाडला. पण  तुम्ही नव्हतात ते खूप जाणवले. असो.'

मला हुश्श झाले !!!

.... भगवद्गगीता.. तरी दुसरे काय सांगते..
परस्परांना समजून घेणे..
.... मैत्र साधणे!!
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme