देवघेव..💐

👩‍🎤देवघेव...

मंगल तणतणत म्हणाली..

"ताई , कौतुकाने मी दिवाळीत मला साडी न घेता.. आमच्या बहिणाबाईला ..(तिच्या मुलाचे लग्न ठरले म्हणून) मोतियांची कर्णफुले भेट दिली. ..मनात आले की .पन्नाशी नंतर परप्रांती..परदेशी.. पर्यटन करताना जरा घालेल ती.कर्ण फुले.. काढेल छान छान फोटो. वगैरे...
माझी बहिणीला खूप वर्षांपासून या झुबक्यांची आवड होती.. मनात आले आपण तिची इच्छा पूर्ण करू..

तिला डबी देताच,उघडून बघत.. तिने..जोरदार ताशेरे ओढले..

''इश्य.. आता मी हे कधी घालून मिरवणार.. हे असले देतात का?वगैरे 10मिनिटे ताडताड लेक्चर.. माझ्या नातेवाईकांसमोर चालले होते!!!

वरील प्रसंग सांगताना मंगला ला रडू आवरले नाही..

वरील प्रसंगावरून मला आईने अनेकदा सांगितलेला प्रसंग आठवला..

अशीच.. आईने तिला जमेल तशी.. एक साडी आणून तिच्या एका नातेवाईक स्त्री ला भेट दिली.

तेव्हा त्या सुशिक्षित स्त्रीने संतापून मोलकरणीला दिली. व म्हणाली..

"तुमच्या समोरच मोलकरणीला देते.म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या स्टँडर्ड ची साडी वापरते ते. आणि परत अशी साधीसुधी साडी तुम्ही मला देणार नाही!'''

वरीलप्रमाणे अनुभव येत राहतात..
आपण सुशिक्षित होत आहोत.. पण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे.. कदर करणे , हे लयाला जात आहे..
जन्माला आल्यापासून.. समज येईपर्यंत घेणे चालू असते..आणि उमज आली की देणे सुद्धा सुरू होते.
प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार, आपुलकीने, काही विचार करून.. फूल ना फुलांची पाकळी देत असतो.
आपण घेव..करताना कुणाच्या मनावर घाव घालू नयेत.
आपल्या पेक्षाही High Standard असलेल्या अनेक व्यक्ती असतात.
अश्या अहंकारी वक्तव्यातून.. माणूस म्हणून काय Standard आहे.. ते दिसून येते. व ज्याच्या मनावर घाव घातला.. त्या फक्त एका मनातून नाही तर अनेक मनातून ती व्यक्ती उतरते.

मित्रहो.. आज मुद्दाम हा प्रसंग विशद केला, त्याचे कारण म्हणजे..
 डिसेंबर महिन्यात.. आपण काही संकल्प करतो.

पैसा,पद ,उच्च शिक्षण, या धुंदीत .. मस्तीत.. गुर्मीत..
.. देवघेव.. करताना आपल्याकडून कुणाच्या मनावर घात होऊ नये..
शाब्दिक घाव हा जन्माचा असतो.. मानसिक रुग्ण बनवतो.खरं ना..
तर.. हाच संकल्प करुया..
मनावर घाव घालणे थांबवुया!

उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme