👩🎤पितृत्व.. अधिकार ? प्रमोदजींचा फोन... मँडम, माझी व्यथा सांगू का.. त्यावर जरूर लिहा.. ते सांगू लागले.. " मँडम, बालपणी मी खूप हूड होतो. माझे वडिल व्यसनी, जुगारी होते. आणि संतापी होते. संतापाच्या भरात आम्हा मुलांना बुटाने,पट्ट्याने ,लाथेने मारायचे.सूज,जखमा,सोलवटणे,खोक पडणे.. सर्व नित्याचे.. पित्याचा अधिकार..अहंकार जागा व्हायचा..गाजवला जायचा.. खरं म्हणजे.. त्यांची वाढती व्यसने आणि तुटपुंजे उत्पन्न यामुळे ते चिडचिड करायचे.पण हे न लक्षात घेता.. बळीचा बकरा आम्ही व्हायचो... मँडम.. माझे लग्न झाले, आणि संकल्प केला.. व्यसन करायचे नाही, आणि मुलांना मारहाण तर सोडाच चापटीसुद्धा नाही. आज मुलगा चाळीस वर्षाचा आहे.. त्याला मुलगा आहे.. पण.. संकल्प चालू आहे. हातसुद्धा उगारायचा नाही...."" . ऐकून माझे डोळे पाणावले.खरचं.. माता-पिता बनणे म्हणजे काही मोठी मर्दुमकी नाही.. प्रत्येक सजीव मातापिता बनतो.त्यात कसला आलाय अधिकार? आत्मपरीक्षण जरूर हवे! मुले हूड..द्वाड ,निगरगट्ट का बनतात?आपण कुठे तरी कमी पडतो.. आपण जे मिळेल ते व्यसनात घालवतो.. उधळतो..आणि मग..त्यांच्यावरच राग...
सुरनळी...Q uelling art झिरमिरत्या धारात.. भिरभिरत्या वाऱ्यात.. रुणुझुणत्या ऊन्हात.. नाजूक रसवेली ( केळी) थरथरत आहे.पक्व पाने, हरित पाने, पोपटी पाने तर लोभसच.. पण..त्याहून लोभस.. राजस.. नुकतीच फुटलेली.. इवली..इवली..सानुली.. कोवळी.. पर्ण सुरनळी.. मोठ्या मोठ्या पानांच्या कुशीत थरथरणारी.. सुरनळी.. झुलणारी.. खुलणारी पर्णोन्नळी (सुरनळी)बघताच मला आठवल्या.. दुर्गाबाई भागवत!!!साक्षात वागेश्वरी.. दुर्गेश्वरी !!! त्या संशोधनासाठी.. रानावनात भटकंती करत..प्रत्येक पानाफुलाशी..हितगूज.. कुजबुज करत..निसर् गाशी संधान साधून त्यांच्या देहाचे अलगूज झाले होते.. एकदा त्यांना कुणीतरी टोपली भर गुलाबाच्या पाकळ्या दिल्या.. लाल मखमली.. गंध पाकळ्या बघून त्या हरखून गेल्या.. काय करावे.. विचार करताना काही सूचले.. त्या कलावतीने.. प्रत्येक पाकळीची सुरनळी करून त्याचे गुच्छ कलाबुतीने.. धाग्याने बांधले.. निवाळी, बकुळी, जाई..जुई, बटन शेवंती ,पानांच्या सुरळ्या मधे मधे घालून.. हजारो पाकळ्यांचा .. सुंदर हार सहा तासाची बैठक मारुन पूर्ण केला....
श्री.अमोल च्या मागणीनुसार.. त्याच्या छोट्या मुलीसाठी इंग्रजी रचना देत रहा.. मी प्रयत्न करते.. देते..जमले तर देते...चू.भू.द्यावी.. घ्यावी..💐 Bird 's nest is on a tree.. In that nest , babies three !!! So ... Don't cut tree.. Leave them free.. Thanks.. Unnati Gadgil🌹🙏
Comments
Post a Comment