भोचकपणा..💐
🌸भोचकपणा..
सध्या माझा नातू आला आहे म्हणून आम्ही खूप खूप आनंदात आहोत.
...शांत जीवनाला एक उमेदीची उत्साहाची किनार लाभते..
अलका ताईनी हतबल स्वरात सांगितले..
"अग उन्नती, माझी नातवंडे आली पाहुणी तेव्हा मी अश्शीच उत्साहाने .. हे कर .. ते कर.. धावून धावून केले. पण संस्कारी मन.. पण सतत computer, सतत फास्ट फूड, 11पर्यंत झोप, आळशीपणा.. या बाबतीत मी जरा ओरडत होते.४दिवस नातवंडे होती. त्यांनी फोन/मेसेजेस करुन आईला सांगितले...
आजी ओरडते. त्रास होतो. वगैरे. मला खूप खूप वाईट वाटले.आणि माझ्या सुनेने पण मुलांना समजावणे सोडून मलाच उपदेश केला..
"आई, रागावू नका माझ्या मुलांना. ..मला चालणार नाही '"
अग.. प्रत्यक्षात मी पाहिले आहे.. सून सतत मुलांवर ओरडत असते ग..
जाऊदे.. कानाला खडा. तेव्हा पासून मी बोलावत नाही..
पण काय ग उन्नती... तुला काय अनुभव.. ?
मी म्हणाले..
"ताई , नातवंडे तर दुधावरची साय!
पण माझ्या कडे माझ्या बहिणीची,नणंदांची,भाच्चाची,मैत्रीणींची मुले त्यांच्या आईवडिलांना सोडून बिनधास्त मजेत राहिली आहेत. मला कधीच असा अनुभव नाही,की मुलांनी तक्रारी केल्या वगैरे..
पण.. एक मात्र अगदी खरे की मुलांना आईने वळण लावणे जरुर आहे..
...की जेथे रहावे तेथे सामावे...
आई वडिलांनी राईचा पर्वत करू नये. आपल्या मुलांनी तक्रार केली तर त्याला ठणकावून सांगावे..
""अरे बाबा, ते तुझे आजी आजोबा आहेत. ते आम्हाला सुद्धा काही चूकले तर ओरडतात , तुम्ही तर.. लाडोबा..
असे म्हणून मुलांना दामटावे पण .. सासू/आईला .. तुम्ही असे करत जाऊ नका ,सांगणे साफ चूक.
बरेचदा मोठ्या माणसांना....विशेषत:वृद्धांना पण सवय असते..
ज्या घरात पाहुणे म्हणून जायचे,त्याच्याच फोनवरून.. य ाघरात माझा छळ होत आहे, उपासमार होते ,त्रास होतो असे बिनधास्त सांगून सहानुभूती गोळा करणे, घरभेदी पणाने वागणे.
हा एक मनोविकार असतो. तो खूप खूप घातक आहे.
मी स्वतः दोन वर्षे माझ्या आईवडीलांकडे दोन उमलत्या कळ्या घेऊन राहिले होते.(अर्थात पैसे देऊन. कारण वित्त हे मूळ असते कलहाचे)
पण.. त्या काळात मुलींना आधीच बजावले होते..
'"तुम्हाला वाडा संस्कृती ची सवय नाही. पण दोन वर्षे मिजास चालणार नाही. जे जसे आहे ते तसे स्वीकारणे. कुणाबद्दल ही अवाक्षर काढले तर .. मी खपवून घेणार नाही.
*जेथें खातो तेथे थुंकतो*
ही वृत्ती नसावी. उलट या संस्कारांमुळे पुढे जीवनात सहज सामावणे जमते. असो.
मुलांवर.. पुढील पीढीवर वेळीच सुसंस्कार घालणे. घरभेदी वृत्ती चा बिमोड करणे हे महत्त्वाचे.
हल्ली.. इवले इवले विद्यार्थी शिक्षकां विषयी,शाळा याविषयी.. पालकांना काही तक्रारी करतात. लगेचच पालक शाळा/शिक्षक यांना दोष देतात.
पण.. हा *भरले कान *
हा रसातळाला नेणारा, एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करणारा अवगूण .. आपण सर्व जण समूळ नष्ट करुया.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment