जप..
🕉जप..
जपावर विश्वास आहे/नाही यावर चर्चा सुरू होती.
माझा मात्र विश्वास आहे.अनेक वेळा अनुभूती पण आली ..
एक प्रसंग..2006 नोव्हेंबर महिन्यात आम्ही तेव्हा मुंबईत होतो.
आम्ही दोघे माझ्या वडिलांसह एका रात्री उशिरा एका पार्टीहून घरी आलो. रात्री 10-30 समय.
मी आल्यावर कपडे बदलून.. वडिलांसाठी दूध गरम करायला ठेवले.
एकीकडे.. बारीक सारीक कामे चालू होती..
माझ्या वडिलांनी मला हाक मारली. (मला जरा चालणे अवघड जाते)
म्हणून मी सहज म्हणाले...
' नाना, चार वेळा नाही चालता येत. दूध गरम झाले की येते.. तुम्हाला दूध आणते आहे. तुम्हीच या.. टेबलवर ठेवते!"
तरी.. त्यांच्या हाका चालूच...
मी गँस बंद करून त्यांच्या बेडरूममध्ये गेले तर..
शर्ट अर्धवटच.. त्यांना पूर्ण काढता येत नव्हता .!!!
हात वर जात नव्हता...
मला कससचं झाले.
मी शर्ट काढला.. बनियन काढला.ते घामाघूम झाले होते.
अचानक..
हात वर जात नव्हता..
मी त्यांचा घाम पुसायला लागले.. तर..कमरेवर ,खांद्यावर.. पुरळाचा लाल पट्टा दिसला.
नागीण? की कंपवात ?
डॉ. ना फोन केला.
त्यांनी सांगितलेले औषध..
फोनवरून मागवले.(मुंबई सम मोठ्या शहरात रात्री अपरात्री सुद्धा उपचार होतात)
त्यांना दूध दिले.ते पण समजून होते..
ते संकोचाने म्हणाले..
'"दात कसे घासू ?"
'"तुला जमेल का?"
मी बळेच हासून...
"नाना, न जमायला काय झाले? तुमच्या वडिलांचे दात(कवळी) मी अनेकदा घासली आहे.
मी आहे ना.. काळजी कसली? द्या .. मी घासून देते!
त्यांचे सर्व केले.. कमरेवर चा पुरळाचा पट्टा वाढत गेला..फोड मोठे झाले.. ताप भरला.. गोळीचा उपयोग होईना..
रात्रीचे पावणे बारा!!!
नानांची उलघाल बघवत नव्हती.
हात.. खांदा.. सून्न!
माझ्या मनात.. विचार..
नागीण?विळखा..
चटकन मी उठून ..शाँवर बाथ घेतला..
ओलेत्याने रात्री 12ते 1जप केला.. तर संकट टळते ..याचा अनुभव या पूर्वी घेतला होता.
पण.. आता नानांचे वय आहे, असो.. जपाने वेदना तरी शमतील.. विळखा वाढणार नाही.असा विचार करून..
बसले जप करायला..
रात्री दिड ला ,माझ्या मिस्टरांनी सांगितले..
नाना झोपले आहेत शांत.
आता बास झाला जप!
खरचं त्यांना झोप लागली होती. विळखा वाढला नव्हता.
पाच दिवस ते हाताने काहीच करु शकत नव्हते.
पण..मी ते सर्व बघत होते.
नंतर तर हात पण सुरळीत चालू झाला.
मला वाटतं औषध तर असतेच,पण वेळी अवेळी नाम जप.. सामर्थ्य देतो.
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment