#नसती उठाठेव.. बंडखोर..बंड्या..💐
#नसती उठाठेव..💐
*बंडखोर बंड्या*
श्री. संतोषजी सराफ..एक हरहुन्नरी.. वल्ली आपल्याला माहित आहे का?
ते एक प्रसन्न.. उद्यमशील व्यक्तीमत्व..
अन् आम्हाला.. पण स्वस्थ बसू देत नाहीत बरं..
काल रात्री बिनधास्त एक काम माझ्या माथी मारलं..अन् गुडनाइट करुन ते गेले सुद्धा ...मला व्यस्त ठेवून ते.. निर्धास्त!!
ढाराढूर..पंढरपूर..
आता . पंढरपूर चा विठोबाच धावून येतो का बघावं..त्याने म्हणे.. जनीचे दळण दळले..मला पण..दळणच..पण जरा वेगळ्या पद्धतीचे दळायला..
येईल का हो .. तो मदतीला?
हे.. विठूराया..मला..सराफ सरांनी सांगितले आहे लिहायला...मला मात्र ब्रम्हांड आठवतयं..काही काही सुचेचना..
सुचवशील एखादी कल्पना..?
करते मी मनोभावे.. तव वंदना.।
तू निराकार.. मी.. निरक्षर..
तूच देई बाबा.. मला.. अक्षरं..
छे... तो विनवणी ऐकेचिना...काही बोलेचिना..
तो..जगजेठी..आपला..कर कटी..उभा..विटी..!
तेवढ्यात.. तो बघा.. दिसला..
आमचा.. बंड्या..
तो.. हो.. रिमझिम धारात..
जेथे..मातीचे..ढीग आहेत.. खड्डे खणून ठेवले आहेत.. तेथेच..रस्त्याचे काम चालू आहे म्हणून.. मोठे सिमेंट चे गोलाकार पाईप ठेवले आहेत.. त्या पाईपात लपून बसला आहे.. बघा..
हां..तोच.. काळा नाही हो..गबाळा तर नाही च नाही..
थोडा.. आहे..सावळा..पण अंतरी.. नाना कळा..
थांब.. आता बघतेच.. चांगले लाटणे घेऊन जाते..
अरे.. बंड्या.. गधड्या.. शाळेत जातोयसं ना?
त्या बरोबर.. पाण्यातून उडी..थेट..
डबक्यात!!!
श्री. महानगरपालिका देवीच्या कृपेने.. प्रत्येक रस्त्यावर.. ठिकठिकाणी...
खड्डे.. सुबक.. सलील युक्त डबकी बनवली आहेत..अन् त्या डबक्यात.. रात्री बेडूक, गांडूळ, डास,चिलटे.. सारे सारे गुण्यागोविंदाने नांदतात..
अन्.. बंडखोर बंड्या.. बालगोपालांसह त्यात डासांच्या संगीतावर.. बेडकांच्या बरोबरीने नाचतात.. गातात..
वर्षाराणी रिमझिम त ताल धरते...
बेडूक रंगात आले की.. भांगडा करतात.
अन्.. मुले..डिस्को..ऐ पथनृत्य..
सारे करतात.. भान हरपून..खेळतात..
मी..जोरात ओरडत.." अरे कार्ट्या.. शाळेत
काय अवलक्षणी कार्ट आहे..!!!
खरं म्हणजे..सुलक्षणी रोपटं आहे..
माळी..सरस हवा..
बंड्या.. एकदाचा शाळेत पोचला....
पहिली घंटा.. होऊन गेली..
टिचरने..भृकुटी आठ्यांची जुडी करत...
निळ्या गोट्या वटारत.. विचारले..
'" काय रे उशीर?" परीक्षा आहे.. ना..मग?
छडी तर केव्हाच कालबाह्य झाली. ..भुsssर्र...उडाली..
अन् रागवणे पण नियमबाह्य !!!
मुलांनी मर्कट चाळे केले तरीही शिक्षकानी सहन करायचे..!
बंड्या... नाचत, उडत....टुणकन उड्या मारत.. वर्गात गेला.
जागेवर बसला..पेपर सुरु..
इतिहास पेपर.. बाकावर तबला वाजवत.. पुढील मुलांना पाय लावत .जोरात जांभया देत.. लेखन चालू होते..
मधेच जोरात किंचाळला...
"टिचर... पोटातून जोरदार कळी आली.
जाऊ का? खूप खूप हशा..
टिचरने हासू दाबत..म्हणले..
""बंड्या.. अरे कळी आली नाही म्हणू.. पोटातून कळा आल्या
म्हणावे रे..
""टिचर.. एकच कळी आली'!
खूप खूप हश्या..
टिवल्या.. बावल्या करत..पेपर सोडवणे चालू होते.
सन आणि घटना जोड्या लावा..काही समजेना.
खूप खूप विचार केला.. एका चिटोऱ्यावर जोड्या लावा..शब्द लिहून चोळामोळा करून.. एका मुलाकडे फेकला..
तो मुलगा हुशार.. पण.. घेतली बंड्याची फिरकी..
मुद्दाम चुकीचे सांगितले..
एका गालावर.. 1बोट व दुसऱ्या गालावर 3बोटे
तसेच... एका गालावर 2बोटे..व दुसऱ्या गालावर 5बोट ठेवून जोड्या सांगितल्या.
बंड्याने लिहील्या.. खुशीत पेपर दिला.
टिचरने पेपर सहज चाळला.. अन् तिची हासून हासून पुरेवाट झाली..
पण हासू दाबत.. तिने बंड्याचा कान पिरगाळत..
"" काय रे बंड्या.. अश्या उलट्या जोड्या लावायला शिकवले। होय रे मी तुम्हाला?
काय रे... आधी अफझलखान वध झाला.. अन् मग शिवाजी जन्मला होय रे?"
सर्व वर्ग.. खळखळून हासला..टाळ्यांचा कडकडाट झाला.
संपूर्ण शाळेत.. बंड्या चा पेपर फिरला..
हास्याची कारंजी उडाली. ..
रुक्ष..रागीट.. शिक्षकांना सुद्धा हांसू आवरेना..
नवा इतिहास संशोधक बंड्या ची बातमी.. घरात पोचली.
मी शाळेत प्रवेश करताच..
टिचरने.. हासत.. हासत..मला बंड्या चा दिव्य.पेपर दाखवला...हासत म्हणाली..
" तुमचा.. नाही नाही.. आमचा हा बंड्या..
नाना उद्योग करतो.. पण दिलेले काम पूर्ण करतो.
बिनधास्त.. वेळ निभावून नेणे..
हासतमुख व नर्म विनोदी वृत्ती हे सारे आकर्षण बिंदु बंडखोर बंड्या त ठासून भरले आहेत.तो इतका मिश्कील की रागवायचे जमतच नाही.
नक्कीच.. मँनैजमैंट गुरु होणार!!!
मी कपाळावर हात मारला..
अन् बंड्याच्या गोबऱ्या गालाचा पापा घेतला.
असा..हा..सावळा..अवखळ.. खट्याळ.. रसाळ.. मधाळ..
बंड्या.. बंडखोर !!!💐
उन्नती गाडगीळ💐

Comments
Post a Comment