स्वातंत्र्य...💐

🍀 स्वातंत्र्य ...
स्वातंत्र्य पूर्व काळात.. सेनापती बापट यांनी त्यांच्या लेकीला पत्र लिहीले , " तू शिक्षीत आहेस , तुझ्या लग्नाचा विचार ..कधी ..कसे..केव्हा..कुणाशी...ते तुझे तूच ठरवायचे ! " त्या नुसार .. लग्न ठरले...
प्रभाकर सप्तर्षि नामक मुलाशी !
बापटांची मुलगी..नववधू .. साध्या सुती साडीत... दागदागिने..ठमठमाट..काहीच नाहीं. बापटांनी स्पष्ट केले , " संसारासाठी फक्त जरुरी पुरते पैसे मी घेतो..बाकी पगार...देशार्पण !!! "
  माझी मुलगी कंचन आहे, शिक्षण व संस्काराने अलंकृत आहे. अन् स्वावलंबी आहे.
जावयाने सुद्धा ... विद्याविभूषित पत्नी हेच माझे भाग्य! हे ठणकावून सांगितले!!!
आज विज्ञान युगात सुद्धा ... सुशिक्षित तरुणाई ला गप्प बसवून .. विवाह सौदा ठरतो... भरमसाठ दागिने , पैसे, वस्तु मागितल्या जातात ..पुरवल्या जातात .. मिरवल्या जातात  !!!
तरुणाई चे मन ...मत.. विचारात घेतलेच जात नाहीं .. स्वातंत्र्य नाहीं ...
विचारांची उदात्तता.. पारदर्शिता ... कधी येणार ? मुलांना स्वातंत्र्य कधी मिळणार ?
उन्नती गाडगीळ 🌷 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme