आईचे पत्र..💐

🍀 आईचे पत्र ...
कपाट आवरताना.. जपून ठेवलेली आईची पत्रे दिसली...आईची पत्रे बोलकी व सविस्तर असायची... आम्ही भूज ला असताना ... आई आमचेकडे एक महिना मजेत राहिली होती ..
परत पुण्यात गेल्यावरचे हे पत्र ...
--- " उन्नती, अग आज पुण्यात खूपच थंडी .. हुडहुडी भरली नुसती ! तू स्वत: माझ्या साठी केलेली शाल लपेटली , अन् काय जादू ग...थंडी पळाली ग ! तू विणलेल्या बकुळ फुलात .. प्रत्येक धाग्यात तुझा उबदार स्पर्श जाणवला !!! तू अचानक मागून येऊन माझ्या अंगावर घातलीस तो क्षण आठवला ! अन् धन्य धन्य झाले ... तू सतत busy असून माझे साठी शाल विणलीस खरच कौतुक वाटले ! प्रत्येक वेळेस तुझ्या घरी.. रोज नवनवे पदार्थ व जीप मधून हिंडणे..फिरणे..अगदी माहेरपण होते बघ !!!
वगैरे ..वगैरे ...
खर म्हणजे भूज मधे एक वर्ष मी नोकरी करत नव्हते.. त्यामुळे बकूळ फुलांची शाल विणली गेली ...पण आईला त्याचे किती अप्रुप ! तिने ती शाल पुढे पण खूप वर्ष वापरली ...
आता फक्त स्मृति सुगंध मागे राहिला आहे ..
आता तर पत्र लेखन संपलेच... हस्ताक्षर... शब्दातल लाघव .. लालित्य ... प्रेम ..आर्जव .. आपुलकी.. नाहींच ! भरभरुन आलेली पत्र ..हे चित्र ...आता ...धूसर ...आता कुणीही कुणालाही I love you!!! म्हणतो.. अन् फेब्रुअरी ..प्रेम -मास साजरा करतं.. कालाय तस्मे नम; ।।
उन्नती गाडगीळ 🌷 🙏 💘

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme