सदुपयोग...

🌺सदुपयोग..
सरिता चा फोन..
'" ताई, मी निव्रुत्ती घेतली आहे. वय45 . काही समाज कार्य करण्याची तळमळ आहे काय करू?'"

मी तिला सांगितले..
1) 2016-18 सर्वेक्षणावरुन दिसून येत आहे..
रात्रशाळेत इ.10 वीच्या वर्गाना  गणित व विज्ञान शिकवायला शिक्षक नाहीत.
व मुले महागड्या क्लासला जाऊ शकत नाहीत.
तरी तू मुलांना फुकट शिकवू शकतेस.
ती मुले दिवसभर कारखान्यात.. खानावळीत.. कुठे कुठे राबतात.. तू गणित व विज्ञान यांत तल्लख आहेस.

2) इ. 10वी 12 वी च्या परिक्षांना अनेक अंध व अपंग विद्यार्थी बसतात. त्यांच्या साठी writer म्हणून तू काम करू शकतेस.

3) 18 व्या वर्षा नंतर अनाथ आश्रमातील मुलांना स्वतः ची सोय दुसरीकडे करावी लागते. ती मुले.. अर्धवट वय,अपूर्ण शिक्षण.. निराधार यामुळे बावरलेली असतात. अश्या एखाद्या मुलाचा शैक्षणिक भार उचलणे, निवाऱ्याची सोय करणे.. असे तू करू शकतेस.

4) कुपोषित गर्भवती व कुपोषित बालके यांचे प्रमाण वाढते आहे.
एखाद्या गरोदर स्त्रीला तू पोषक आहार पुरवू शकतेस.

अनेक कामे आहेत. नुसती देणगी देण्यापेक्षा तुझ्या बुद्धी चा वापर करून..थोडा वेळ देऊन एखाद्याचे जीवन छान मार्गी लावू शकतेस.
तिला ते पटले. मला आनंद झाला.. तिच्या स्वेच्छानिवृत्ती तून एक आदरणीय प्रव्रुत्ती बनत आहे...
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme