चपराक...💐

🌺चपराक..
'" दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात तिसऱ्याने नाक खुपसू नका ."
अशी चपराक सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतीला लावली....

अत्यंत खणखणीत .. चपराक...

सुरळीत चाललेल्या कुटुंबात.. गरज नसताना.. एखादे जवळचे नातेवाईक .. कटकारस्थाने करून नाती उद्ध्वस्त करते..
घरोघरी अशी उदाहरणे असतात.

*एक बहीण* ... सुसंस्कृत, सभ्य, अती हुशार, भोळी भाबडी..
भावाच्या घरात जाऊन.. आईवडीलांशी संगनमत करून भाऊ..भावजयीची हकालपट्टी केली.. घर उद्ध्वस्त केले. तेव्हा शांत.. त्रुप्त झाली...
स्वतःच्या बहिणीच्या घरात ही काड्या टाकून.. खोटे आरोप करून तिला जीवनातून उठवले तेव्हा शांत.. शांत झाली....

अशी खूप खूप उदाहरणे आजुबाजुला सतत घडत असतात. ..
भोचकपणा करणे, नाक खुपसणे, कान भरणे, कागाळ्या करणे.. नात्यात भिंती घालून.. गंमत बघत बसणे..
ही व्रुत्ती.. तनामनात ठासून भरलेली आहे..
ही *कोती व्रुत्ती* काढून टाकण्यासाठी.. कुटुंब संस्था सशक्त बनवण्यासाठी आता न्यायालयाचीच मदत घ्यावी लागणार का ???
 न्यायालयाने.. खाप पंचायत ला दिलेला..
*नाक खुपसू नका * 
हा इशारा सर्वांसाठी आहे. असे निदान सुशिक्षितांनी जरी जाणले अन् तसे वर्तन केले तर आणि तरच..
नाती ... तुटणार नाहीत.
कुटुंब संस्था टिकून राहण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा हा इशारा..
*झणझणीत अंजन* होय !!!
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme