ठोक्याचं पातेलं...💐

🌸ठोक्याचं पातेलं..

वीणाचा मेसेज....
 --- तुझं  मोठे पितळ्याचं ठोक्याचं पातेलं पाठव ग. 20जणांचा उंधियो करायचा आहे... अग, सूनेने घरात अडगळ नको म्हणून सारे मोडीत घातले..... ... ....

हं.... आमच्या नवीन संसारात मोठे पितळ्याचं ठोक्याचं पातेलं घेणं एक स्वप्न होतं.अन् ते साकारायला चार वर्षे लागली.!
पैसे साठवत.. साठवत.. एकदाचं ते लखलखीत.. चकचकीत पातेलं खरीदलं.!माझे बघून वीणाने पण खरीदलं!!

कुणाकडे पार्टी.. बारसे.. बारावा.. काही असो.. आमचं पातेलं काँलनीभर फीरत राहिले.

गेली कित्येक वर्षे मात्र ते माळ्यावर चूपचाप ...

मी विचार मग्न असताना, सरूबाई आली..
लगेच तिची मदत घेतली..

लाकडी उंच स्टुलावर जेमतेम 5'उंच सरुबाई उभी.. मी तिला घट्ट धरून ,रामनाम जपत,जीव गोळा करून, स्टुलापाशी उभी राहून मान उंच करून तिला सूचना देत होते..
"पहिल्या ओळीत बघ..ती भांडी बाजूला घे.. हं.. अश्शी.. तेथे नाही? बssर ,आता दुसऱ्या ओळीत बघ..
अग.. तेथे तर.. स्टील ची पातेली.. तसराळी दिसतात.. नको..नको..
आता.. pl. शेवटच्या ओळीत बघ ना.. जरा..
ती बिचारी.. पाय उंच करून.. डोके माळ्यात खुपसून (मनात मला शिव्या घालत)वरवर हासत... एक मोठ्ठ पातेलं जीवावर उदार होत ओढत होती...
एकदाचं ते पातेलं पुढे आले.!
मग परत माझ्या तील मालकीण गरजली...
" हं.. आता ती जी भांडी वेडीवाकडी केली ती नीट मांड!
ते झाले .. एकदाचं जड लडदु कसाबसा खाली उतरला.. दोघींच्या माना मोडल्या..
पण जीव पातेल्यात पडला!हुश्श झाले!लढाई जिंकली!
हल्ली आपले माळे चकाचक असतात.. त्यामुळे धूळ स्नान नाही झाले.. पण.. हात.. मान.. दुखावले हे खरे .
सरूबाई ची मी पाठ थोपटली.. गारेगार सरबत दिले.. ते सारे झाले.पण..मनात आले.. पातेलं खरेदी करायला एका पीढीला किती वर्षे लागली.. अन् मोडीत काही क्षणात घातले..  कालाय तस्मै नमः।

उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme