वीण.. लघुकथा..💐
(स्वाती ताईने विषय दिला. म्हणून तिचे शतशः आभार)
--- --- वीण--- ---
एक झोकदार वळण घेऊन शलाकाची गाडी आलिशान बंगल्यासमोर थांबली.
सुनिता मावशींची लख्ख गोरी,हासरी प्रसन्न मुर्ती सामोरी आली. गळामिठी झाली.
दोन वर्षापासून F.B. वर *स्वयंपूर्णा* ग्रुपवर सुनीता बाई व शलाका यांचे विचार धागे जुळले व एक मैत्री ची रेशमी *वीण* तयार झाली. अन् आज आभासी नाते प्रत्यक्षात अवतरले!
सुनीतामावशीचा सध्या अम्रुत महोत्सव !पण त्यांच्या नजरेतुन.. कलेतून..व्रुत्तीतून... घरात ठायी ठायी अम्रुत रस ठिबकताना दिसला..
सर्वत्र सुबक कलाकुसर!
बागेत.. घरात.. रंगसंगती साधून दमदार वीण घातलेली दिसली.
मखमली गुलाबजाम, रंगतदार पुलाव, पराठे,रसदार कालवण चाखता..चाखता.. हळूच आपल्या गत जीवनाची वीण उकलली...त्या सांगू लागल्या...
केरळमध्ये वास्तव्य होते. त्यांचे पती जेमतेम 32 असताना निवर्तले..
जीवन वस्त्राचा काठ सुद्धा पूर्ण न होता.. वीण तुटली.
पण.. मावशीने आंसू धारांना थोपवत..सुईधागा हातात घेऊन.. शिवण,भरतकाम, कलाकुसर, वर्ग चालवत.. दोन मूलांचे संगोपन.. शिक्षण.. कार्य केली. दोन्ही मुले परदेशात.
वय..व्याधी यांची वीण दाट होऊ लागली. एकाकी जीवन.. म्हणजे जीर्ण वस्त्र!
त्यात 2005मधे त्सुनामीच्या एका फटक्याने..घरादाराची वाट लागली.. त्या वेळी.. मी कोलमडले..तापाने फणफणले.. थरथरले..
शेजारच्या बंगल्यात सतीश जी.. विधूर.. त्यांची मुले दूर..
एकमेकांना सोबत एक गरज बनली. सुखद .. धागे वीणले गेले.. आधार...हवासा वाटला.
उच्छ्श्रुंखलता नव्हती..
सहकार.. आधार होता.
त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला..
माझे मन विचार वीण घालण्यात तरबेज!
मी समजावले..
पोक्त वयात विवाह केला..
तर आपल्या नंतर .. स्थावर,जंगम मालमत्ता.. वारसदार.. वाटण्या.. गुंताचगुंता होईल.
त्या पेक्षा वार्धक्यात Live in is safe!!!
तारुण्यात live in मधे मुले जन्माली तर.. हे प्रश्न आहेत.
वार्धक्यातील प्रेम.. अशारिरीक.. त्यामुळे धोका नाही.. फक्त सोबती!!! अरिष्ट कोसळलं की धारीष्ट येते !!!
शलाका, मुलांच्या संमतीने आम्ही उभयता चार वर्ष live in मधे होतो.!
पण.. नियती ने ती मनोवीण पण.. तोडली..
ते अचानक गेले!!!
परत.. परत.. माझ्या जीवनवसत्राचे टाके तट् तट् तुटले. मी केरळ सोडून येथे आईच्या घरात आले.
परत.. नव्याने.. रंग.. धागेदोरे जुळवत ही जीवन वीण.. तयार केली.!"
शलाका ऐकतच राहिली.
मावशींची एकेक सुरकुती..
म्हणजे.. एकेक आखीव रेखा.. त्यात कर्तृत्वरंग भरुन.. बनली होती.. सुबक वीण !
त्या तेजची, करारी स्त्रीने खूप खूप मौलिक संदेश दिला!
शलाका ने पण मावशी समोर मनमोकळे केले..
आपण सुशिक्षित, तरुण,परित्यक्ता.. तरीही कोसळतो.. सारेच पुरुष वाईट असतात असे समजतो.. परत लग्न कर म्हणणा-या आईबाबांशी भांडतो..
पण.. सोबती.. सहकारी.. पती.. सर्वाची गरज मला.. या शलाकाला आहे!!!
प्रेम म्हणजे.. फक्त शारीरिक संबंध नाही, तर सहज मनसंवाद साधणे.मनोमिलन.. आधार.. साथ.. या तीन रंगाची सुबक वीण!
हळूच मावशीनी उबदार, उठावदार, दमदार नाजूक बकुळ फुलांची वीण घालून बनवलेला स्कार्फ शलाकाच्या गळ्याभोवती लपेटला...
दोघीनी गळामिठी मारली.
सकारात्मक द्रुष्टी ..घेऊन शलाका बंगल्याबाहेर पडली..
हात हालत होते..
डोळे गळत होते..
F.B. वरची मैत्री फेक नव्हती.. नेक होती .. घट्ट.. दाट .. उबदार वीण..
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments
Post a Comment