भाग्य...💐
⭐ भाग्य...
नशीब हे फक्त व्यक्ती सापेक्षच असते असे नाही... तर..निर्जीव वस्तू, वास्तु,वाहने..एवढचं नाही तर लेख.. काव्य.. यांचे सुद्धा भाग्य उजळणे वा कोळपणे हे सारे सजीवांवर अवलंबून असते.आज मला त्याचा प्रत्यय आला...
आज.. 17-2-18 बडोदा येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर काव्य वाचनासाठी माझ्या कवितेची निवड झाली आहे. पण मी काही अपरिहार्य कारणांमुळे जाऊ शकत नाही...
वर्णस्वरांना व्यंजनांचा साज चढवून, मोजून.. मापून.. मी एक गोजिरे रूप (काव्य) तयार केले.
ते गोजिरे रुपडे आपले साजिरे पंख पसरत..
आज.. बडोद्याच्या .. राजमहालासम सजलेल्या काव्य मंचावर.. मोठ्या दिमाखात मिरवणार होते.
पण.. पण.. मीच तेथे जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या कवितेचेही पर.. मिटले..
माझ्यामुळे ती कविता सुद्धा बासनात बंदिस्त झाली. ही मला खंत आहे.
पण आज मी ते गोजिरे रूपडे.. येथे मांडते...
*** *** पाखरे*** ***
कविता.. पाखरे..💐
इटुकले.. पिटुकले.. धिटुकले पक्षी..
निळ्याशार आकाशात चितारती नक्षी ।
क्षणार्धात भुईवरी.. क्षणार्धात नभा..
गाणे गाती फांदीवरी..उजळत प्रभा ।
टोकरती काळी माती..पेरताती दाणा..
लहरती.. झोके घेती .. खुलवती राना ।
ठुमकत.. मुरकत..वेळावती माना...
लचकत.. थिरकतं.. सुखावती मना ।
नासलेले..फेकलेले.. चिवडती कण..
फडफडे.. धडफडे..थरारते क्षण।
नाही खंत.. नाही खेद .. विसरती घाव...
खुले रंग.. खुले संग..स्वच्छंदी धाव ।
घरट्यात.. आनंदात..विसावतो थवा..
सयमन.. समाधान.. शिकवतो सर्वा ।
उन्नती गाडगीळ 💝

Comments
Post a Comment