मिठी...💐

🌹मिठी...
 बाळ रांगत.. रांगत...
खुदुखुदू हासत ।
गाल फुगवत...
झेपावे.. आईच्या कुशीत।
धन्य धन्य मात्रु मिठी...
तरल... वत्सल.. रेशीम गाठी।

 वारा वाहे झुळुझुळु...
जळ वाजे  खळबळ ।
लाजरी थरथरती वेल..
विसावे.. व्रुक्षाच्या कवेत।
भावुक.. खोल मिठी...
मुग्ध कळ्या फुलती देठी..देठी।

कडेकपारीतून थरारत..
दगडगोट्यांना चुकवत।
नदी वाहे आवेगात..
विरघळे.. सागर पाशात।
भव्य.. दिव्य.. साखर मिठी...
विश्वासक.. अलौकिक गाठी।

क्रुष्णमेघ गडगडत...
गरजत.. वाजत ।
रुणुझुणु.. नाचत...
आनंदे.. धरेस घेई कवेत।
भावुक, प्रेममय अलिंगन...
आश्वासक... चिरंतन।
उन्नती गाडगीळ 🌹🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme