माझा .. व्हँलेंटाईन..💐

🍀 व्हॅलेंटाईन 🍀
खळ्कन् फुटला...काचाच काचा सर्वत्र विखुरल्या... कण् न् कण वेचता वेचता.. त्याच्या मणभर स्मृतित मी रमले...
पांढरा शुभ्र ..सोनेरी काडीचा..गुलाब फुलांनी सजलेला.. हा माझा कप ..माझा ३४ वर्षाचा साथी ... Yesssss.... Valentine....
मुंबई महानगरीत प्रवेश केला.. त्याच दिवशी तो माझा सखा झाला ... काही वर्ष मी ..घरगुती पदार्थ ...लाडू.चिवडा, चटण्या, लोणची, मसाले ..बनवुन विकणे उद्योग करत होते...
तेव्हापासून... हाताला चटके बसताना... परिस्थितिचे फटके खाताना... पायांची फरफट होताना. .. सख्याशी गूज करताना... स्नेह वेली वाढवताना... विजयाचे हार  मिरवताना... पराजयाचे  हार स्वीकारताना... सुखस्वप्ने जागताना... मोती तट् तट् तुटताना... फुले वेचताना... आरोप झेलताना... गद्गगद्ताना...गहिवरताना.. सारे साहताना..खळख ळून हासताना... आतल्याआत आक्रंदताना... या कपाने मला हुरुप दिला... दिलासा दिला... मला चटका बसु नये म्हणून सदैव कान माझ्या हातात दिला ... अन् आज मम मनाला चटका लावून चुरा ... चुरा.. झाला.
इतके वर्ष मूकं साथ देणारा ... आज मात्र खळ्कन् आवाज करत Good bye 🙋 म्हणाला...
उन्नती गाडगीळ 🌷

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme