नंबर..नेम्...💐

चार वर्षीय अमरला Number names ... म्हणताना मी  बघीतले ... वन् ... टू ... थ्री ... टेन पर्यंत गाडी सुरळीत  ! नंतर मान खाली घालून,नजर वर करुन मिश्किलतेने व बिनधास्त गाडी सुरु ... " इलेवन ... इले टू .... इले थ्री ...
इले फोर .... इले नाइन ..... पर्यंत ... सराईत पणे ... एका दमात ... एका ठेक्यात !
माझी हसून हसून पुरेवाट झाली. त्याची आई मात्र खूप भडकली ! ४ वर्षाचा झाला !! अजून Number Names  म्हणाता येत नाहींत ! अगदी ' ढ ' आहे ! कस होणार त्याच ? वगैरे !
मी  अमरला जवळ घेत तिला समजावले ,
" मला तर त्याच्यात easyy method  संशोधक दिसला ! आत्मविश्वासु , खुबीने पर्याय शोधणारा management गुरू  दिसला ! पारंपरिक सिद्धांताला छेद देऊन नवनिर्मिती करण्याची वृत्ति ही एक चतुराई आहे. त्याच्यातील कल्पक वृत्तिला चिंतन , श्रवण , संस्कार रुपी खतपाणी घालून एक कल्पक कलाकार / संशोधक जगासमोर ठेवणे हे तुझे काम ! "
त्यासाठी ' ढ ' , ' आळशी ' विशेषणे न लावता , दुस-याशी तुलना न करता , सूप्त गुणांना  झिलाई लावत रहा !!! "
खरच प्रत्येकात सूप्त गुण असतात . आपण नीर क्षीर विवेकी होऊया ....
                  उन्नती गाडगीळ 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme