खत लिखदे. सावरियाके नाम..💐

🍀 ' खत ' लिख दे..सावरियाके नाम बाबू ...
हे गाणे ऐकताना...एक प्रसंग आठवला...
...अमदाबाद वास्तव्यात... कांता नामक सफाई कामगार ...मला म्हणाली, " बेन , मेरा पती दूर राजस्थानमें ! मुझे लिखने पढने नहीं आता ! "
मी खूप विचार करुन ... गुजराती मूळाक्षरे... २-३ छोटी छोटी पुस्तके आणली ! मला गुजराती लिपीचे वळण आत्मसात करायला ५-६ दिवस लागले...नंतरच्या आठवड्यात मी शब्द व वाक्ये लिहायला शिकले... हळू हळू तिला ...पत्र लिहून देणे मला जमू लागले...
तिच्या अपेक्षा वाढू लागल्या... अलंकृत रसभरी प्रेम पत्र अन् गुजरातीत मी लिहावे...अशी तिची अपेक्षा ... अन् माझे गुजराती अगदीच बाळवोध ! मग मी सरळ तिलाच पाटी पेन्सिल दिली...व रोज गुजराती अक्षरे शिकवुन तिला तयार केले...' गुजरात समाचार ' वृत्त पत्र रोज दोघी वाचायचो...' गुजरात समाचार ' रेडियो वर ऐकून मी लेखन करायची.. दुसरे दिनी तिला नवनवी वाक्य लेखन शिकवायचे...' प्रेम ' किती शक्तिशाली असतेबघा... 25 वर्ष निरक्षर राहिलेली कांता... 42 दिवसात गुजराती शिकून पतीला.. पत्र लिहू लागली ...
कांता आता ७१ वर्षीय आहे ... काल तिने मला..w.a.वर ' मराठी दिन शुभेच्छा  ।' हा msg. दिला ! माझा ऊर भरुन आला !!!
आज विज्ञान दिन ! प्रगत विज्ञानामुळे ..अनेक दूर दूर असलेली अंतरे..जोडली जातात!
मनोमन वंदन विज्ञानाला...प्रेम भावनेला व अक्षर निर्मात्याला ...
उन्नती गाडगीळ 🌷 🙏

Comments

Popular posts from this blog

पितृत्व.. अधिकार?

Paper quelling art - स्फूट लेखन

एक Rhyme