पुस्तके...
........ व्यथा ......
सुबक वेष्टन ... सुंदर पुस्तके ....
बंद काचेच्या कपाटात ... एका रांगेत ।
अनेक कथा ,कादंब-या .. सारे ... सारे ...
वाचकांच्या प्रतिक्षेत !!!
कुजबुजतात , डोळे पुसतात ....
लेखकांचे आयुष्य संपले ...
आपल्याला घडवताना ....
काव्य संग्रह ... चडफडतात .. चुटपुटतात...
कवि कफल्लक झाले ...
शब्दात भाव गुंफताना ।
ऐतिहासिक ... ग्रंथ ... ज्ञान कोष ...शब्द कोष....
खचून जातात ... हळहळतात ...
ग्रंथकारांचे डोळे खचले ... पाय पिचले...
संदर्भ गोळा करताना , साकारताना ...
स्वत्व हारवून बसतात !!!
आपण आहोत लोकांसाठी ,
अन् लोक इंटरनेट पाठी ।
कुणीच नाहीं वाली ,वार्धक्य अकाली !
बसल्या जागी ,पर्णे गळतात ... जीर्ण होतात !
.... .... वाचकांच्या प्रतिक्षेत .........
आपण नटून थटून बसणार .....
अन् एक दिवस संपून जाणार !!!
उन्नती गाडगीळ 🙏
सुबक वेष्टन ... सुंदर पुस्तके ....
बंद काचेच्या कपाटात ... एका रांगेत ।
अनेक कथा ,कादंब-या .. सारे ... सारे ...
वाचकांच्या प्रतिक्षेत !!!
कुजबुजतात , डोळे पुसतात ....
लेखकांचे आयुष्य संपले ...
आपल्याला घडवताना ....
काव्य संग्रह ... चडफडतात .. चुटपुटतात...
कवि कफल्लक झाले ...
शब्दात भाव गुंफताना ।
ऐतिहासिक ... ग्रंथ ... ज्ञान कोष ...शब्द कोष....
खचून जातात ... हळहळतात ...
ग्रंथकारांचे डोळे खचले ... पाय पिचले...
संदर्भ गोळा करताना , साकारताना ...
स्वत्व हारवून बसतात !!!
आपण आहोत लोकांसाठी ,
अन् लोक इंटरनेट पाठी ।
कुणीच नाहीं वाली ,वार्धक्य अकाली !
बसल्या जागी ,पर्णे गळतात ... जीर्ण होतात !
.... .... वाचकांच्या प्रतिक्षेत .........
आपण नटून थटून बसणार .....
अन् एक दिवस संपून जाणार !!!
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment